जळगावराजकीय

भाजपचा तगडा नेता मंत्री गिरीश महाजनांच्या विरोधात दंड थोपटणार?

विधानसभा निवडणुक चुरशीची होणार

जळगाव, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l महाराष्ट्रात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. पुढच्या काही दिवसात विधानसभा निवडणुकां जाहीर होतील. या साठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून मोर्चेबांधणी करत आपापली तयारी सुरू केली आहे. महायुती विरोधात विरोधी पक्ष डावपेच आखत आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जळगाव महायुतीचे राज्याचे ग्रामविकास मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांच्या विरोधात तगडा उमेदवार शोधला आहे.

भाजपचे नेते व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना शह देण्यासाठी शरद पवार यांनी एक तगडा उमेदवार शोधला आहे. भाजपचे जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे हे गिरीश महाजन यांच्या विरोधात विधानसभा लढविणार असल्याची माहिती मिळत असून ते शरद पवारांच्या तुतारी या चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याचं समोर आलं आहे.

लवकरच खोपडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असून ग्रामविकास मंत्री  गिरीश महाजन यांच्या विरोधात जामनेर विधानसभा लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

जामनेर विधानसभा मतदार संघात शरद पवार मराठा कार्ड वापरणार असून या जामनेर विधानसभा मतदार संघात मराठा समाजाची १ लाख ४० हजार मतदार आहेत.आणि भाजपचे जळगाव जिल्ह्यात मोठे नेते मानले जातात . व मराठा नेता म्हणून ओळखले जाणारे खोपडे हे जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत.

भाजपचे जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांच्या गटात प्रवेश करुन दिलीप खोडपे हे गिरीश महाजन यांच्याविरोधात जामनेर विधानसभा शरद पवार यांच्या तुतारी या चिन्हावर लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सुरु असून ही यात्रा २१ सप्टेंबर रोजी जळगाव जिल्ह्यामध्ये दाखल होणार आहे. याच शिवस्वराज्य यात्रेदरम्यान खोडपे हे तुतारी हाती घेऊ शकतात, स्वतः शरद पवार या पक्षप्रवेशाला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!