तळीरामांच्या खिशाला कात्री लागणार, महाराष्ट्रात दारू महागणार?
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l तळीरामांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. महसूल वाढीसाठी दारूवरील टॅक्स मध्ये वाढ करण्यात येणार असल्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत.या मुळे तळीरामांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
लाडकी बहिण योजनेमुळे आता मद्यपींच्या खिशाला कात्री लागणार आहे. तूट भरून काढण्याकरिता दारूवरील टॅक्स मध्ये वाढ करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. मद्यविक्री आणि परवान्यातून दरवर्षी ४० हजार कोटींचा महसूल शासनाला मिळतो. त्यात १ हजार कोटी लायसन्स फी चा समावेश असून दरवर्षी सुमारे १० ते १५ टक्के लायसन फी मध्ये वाढ केली जाते. जास्तीचे मद्य परवाने देऊन महसूल वाढविण्याचा उद्देश समोर ठेवण्यात आला आहे.
महसूल वाढीसाठी दारुवरील कर वाढण्याची शक्यता आहे. अनुज्ञप्तीसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात वाढ होण्याची दाट शक्यता असून दरवर्षी नुतनीकरण होणाऱ्या परवाना शुल्कात ही वाढ होऊ शकते. महसूल वाढीसाठी विदेशी मद्याच्या आयात करात वाढ होऊ शकते. एकूणच मद्याच्या कर व शुल्कात वाढ केल्यामुळे तळीरामांना आर्थिक चटका सहन करावा लागू शकतो.

सध्या राज्यात उत्पादन शुल्क चे दर निर्मिती मूल्यावर विदेशी मध्यावर ३०० टक्के, देशी मुद्द्यावर २१३ टक्के व बियर वर २३५ टक्के आहेत. परदेशी ब्रँडचे बीयर आणि दारुच्या दरात वाढ पाहायला मिळू शकते. त्यामुळे परदेशी दारु पिण्याची आवड असणाऱ्या व्यक्तींना अधिकचे पैसे मोजावे लागेल.