लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी होणार? आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं…
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना दरमहा १५०० रुपये जाहीर केले. त्या प्रमाणे पाच महिन्यांचे प्रत्येकी ७,५०० रुपये दीलेही. पुन्हा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यात निवडणुकीत जिंकल्यानंतर लाभार्थी लाडक्या बहिणींना १५०० रूपयांऐवजी २१०० रूपये दिले जाणार असे आश्वासन दिले होते.
त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार आल्याने आता लाडकी बहीण योजनेचे काय होणार? यावरून तर्क वितर्क लावले जात आहे. तर विरोधकांकडून टीकास्त्र डागलं जात आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत लाडकी बहीण योजना ही बंद होणार नसल्याचे स्पष्ट सांगितले होते. तर दरमहा २१०० रूपये दिले जातील आणि पण त्यासाठी बजेटच्या वेळी आम्ही तसा विचार करू असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले होते.
दरम्यान, राज्यभरात लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पुन्हा छाननी किंवा पडताळणी केली जाणार अशी चर्चा सुरू आहे. नक्की काय? लाडक्या बहिणीच्या अर्जाची पुन्हा खरचं पडताळणी होणार का? असा प्रश्न लाडक्या बहिणींना भेडसावत आहे. मात्र या चर्चा फेटाळत अशाप्रकारची कोणती छाननी करण्याचा सरकारचा विचार नसल्याचे राष्ट्रवादीच्या आमदार आणि माजी मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले तर कोणत्याही अर्जांची छाननी करायची झाल्यास तक्रारीच्या आधारे करावी लागते. कोणाकडून तक्रारी प्राप्त झाल्या असतील तर त्या तपासल्या जातील. मी महिला आणि बालविकास खात्याची मंत्री असताना अशा तक्रारी प्राप्त झाल्या नव्हत्या. आत्ता आल्यात की नाही ते मला माहिती नाही. पण कोणीही अशा पद्धतीने तक्रार केली असेल तर विभागाचे आधिकारी निर्णय घेतात. आता तक्रारी आल्यात की नाही यासंदर्भातील मला माहिती नसल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले.