भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

एक रुपयात पीक विमा योजना गैरव्यवहारामुळं बंद होणार? “त्या” सीएससी केंद्र चालक व बोगस शेतकऱ्यांची चौकशी होणार

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात एक रुपयात पीक विमा योजना अंमलात आली. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना केवळ १ रुपया भरुन अर्ज पीक विम्याचा अर्ज दाखल करता येत होता.

या योजनेत गैरव्यवहार झाल्याची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. पीक विमा योजनेत बोगस शेतकऱ्यांनी दुसऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर पैसे लाटल्याचा प्रकार समोर आला. या योजनेत गैरव्यवहार झाल्याची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. त्यामुळं या योजनेत बदल करण्यासंदर्भातील शिफारस, सरकारला करण्यात आल्याची माहिती आहे. कृषी आयुक्तांच्या अध्यक्षते खालील समितीनं राज्य सरकारला दिल्याची माहिती आहे. ही योजना बंद करण्याबाबत शिफारस सरकारला करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

पीक विमा योजनेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात भाजप आमदार सुरेश धस यांनी केला होता. त्यांनी बीड, धाराशिव जिल्ह्या सह राज्यात अनेक ठिकाणी पीक विमा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. धाराशिव जिल्ह्यात एक एफआयआर झाला होता, परळी तालुक्यातील २२ सीएससी सेंटरवरुन घोटाळा झाला होता.

तीन हजार हेक्टरचा विमा भरणारे शेतकरी परळी तालुक्यातील आहेत, अशी माहिती सुरेश धस यांनी दिली होती. बीडच्या माजलगावातील रोशनपुरी गावात देखील पीक विमा योजनेत मूळ शेतकऱ्यांच्या नावावर दुसऱ्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेसाठी अर्ज केल्याचं सुरेश धस यांनी उघडकीस आणलं होतं. इतकेच नव्हेतर जलसंपदा, महावितरण, जंगल, गायरान जमीन, वन खात्याच्या जमिनीवर पीक विमा भरल्याचा दावा सुरेश धस यांनी केलेला होता. हीच परिस्थिती जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलढाणा अशा राज्यातील अनेक जिल्ह्यात आहे.

राज्यभरातून सीएससी केंद्रांवरुन पीक विम्याचे अर्ज दाखल करण्यात आले होते. या योजनेत सीएससी केंद्र चालकांना ४० रुपयांची रक्कम मिळत होती. त्यामुळं या योजनेचा अधिक लाभ सीएससी केंद्र चालकांना झाल्याचं समोर आलं होतं. बोगस अर्ज भरणाऱ्या केंद्र चालकांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. हीच परिस्थिती संपूर्ण राज्यभरात आहे. भूमिहीन असताना दुसऱ्यांच्या शेतावर पीक विमा काढून लाखो रुपये हडप केले आहेत.

जळगाव जिल्ह्यातही जळगाव जिल्ह्यातही असे अनेक प्रकार घडले आहेत. यांची चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले गेले. रावेर, यावल तालुक्यासह जळगाव जिल्ह्यातील पीक विमा लाटल्याची बोगस प्रकरणे पुढच्या बातमीत…

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!