भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रशैक्षणिक

राज्य सरकार अधिवेशनात विद्यार्थिनींसाठी घेणार मोठा निर्णय?

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच अधिवेशन गुरुवार पासून सुरु होत आहे. या महायुती सरकारच्या कारकीर्दीतील हे शेवटचे अधिवेशन असल्याने येत्या काही दिवसात विधानसभेच्या निवडणुका असल्याने महायुती सरकारकडून अनेक महत्त्वाचे मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

यादृष्टीने अधिवेशनात लोकप्रिय घोषणा, निर्णय आणि आश्वासनांची खैरात होण्याची दाट शक्यता आहे. आणि त्यातच राज्य सरकार या अधिवेशनात महिला मतदारांना खुश करण्याच्यादृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे. राज्य सरकारकडून मुलींचे पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत केले जाऊ शकते. हा निर्णय शिक्षण घेत असलेल्या मुलींना मोठा दिलासा  देणारा ठरेल. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने महायुतीला याचा राजकीय फायदा होऊ शकतो.

मुलींचे पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. यासंदर्भात गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सखोल चर्चा होईल, अशी माहिती आहे. यासंदर्भात प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता राज्य सरकार मुलींच्या पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत करण्याची घोषणा करणार की नाही, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!