भारतात कोणत्याही क्षणी WhatsApp बंद होणार? काय आहे प्रकरण?
मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l WhatsApp हे एक प्रसिद्ध मेसेजिंग ॲप आहे. व्हॉट्सअँप भारतात बंद होणार अशा मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगल्या. या बाबत एका खासदाराने राज्य सभेत प्रश्न उपस्थित केला.
या संदर्भात शुक्रवारी राज्यसभेत माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या बाबत माहिती दिली. की whatsapp किंवा पालक कंपनी मेटाने या संदर्भात सरकारला कोणतीही अशी माहिती दिली नाही. की व्हॉट्सअँप बंद करणार म्हणून. असं इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सांगितलं.
भारतात व्हॉट्सअँप आपला व्यवसाय बंद करण्याची योजना आखत आहे काय? कारण सरकारने त्यांच्याकडे युजर्स च्या डिटेल्स मगीतल्या होत्या. असा प्रश्न काँग्रेसचे खासदार विवेक तनखा यांनी विचारला होता. जर सरकारने आपल्याला मेसेजच इनक्रिपशन मोडण्या साठी जबरजस्ती केली तर भारतातील सुविधा बंद करणार. असं पालक कंपनी मेटा न म्हटलं होत. यावर त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.