आरोग्यचाळीसगाव

प्रा.आ.केंद्र दहीवद व अंतर्गत उपकेंद्रात हिवताप जनजागृती महिना साजरा ….

विविध उपक्रमांतून जनजागृती

चाळीसगाव,मिंडे टु मंडे न्युज नेटवर्क l प्राथमिक आरोग्य केंद्र दहिवद ता.चाळीसगाव अंतर्गत सध्या सुरू असलेल्या हिवताप प्रतिरोध महिना असल्याने नागरिकांना किटकजन्य आजार,जलजन्य आजार बद्दल माहिती देण्यात येत आहे,जसे पावसाळ्यात परिसर स्वच्छता, मोठ मोठी पाणी साठवण्याचे हौद, रांजण,टाक्या इ झाकण पक्के बसविणे साचलेले पाणी वाहते करणे, क्रूड ऑईल चा वापर करणे,खिडकी ला जाळी बसविणे इ किटकजन्य आजार पासून बचाव करणे,पावसाळ्यात पाणी उकळून पिणे,चार पदरी कपड्याने पाणी गाळून पिणे याबद्दल नागरिकांना सल्ला देण्यात येत आहे.

तसेच शालेय विद्यार्थ्यांना हात धुण्याची पध्दती व इतर आरोग्य बद्दलची माहिती देण्यात येत आहे.त्याप्रसंगी प्रा आ केंद्राचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत बोरसे सर तालुका आरोग्य अधिकारी व बेलदार तालुका हिवताप पर्यवेक्षक चाळीसगाव यांचे सूचनेनुसार, डॉ.अक्षय देशमुख ,डॉ.शीतल नगराळे यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप पाटील आरोग्य सहाय्यक यांचे देखरेखीखाली श्री एन एन विसपुते आ. से.श्री.एस. एस. डोईफोडे, आर.एस. चव्हाण, एन. एस.बागुल आरोग्य सेवक व आशा वर्कर हे गृहभेटीद्वारे प्रा. आ. केंद्र दहिवद अंतर्गत सर्व गावात कंटेनर सर्वेक्षण करित आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!