बोदवळराजकीय

प्रचाराचा ताफा घेऊन रोहिणी खडसे शेताच्या बांधावर, ओला दुष्काळ जाहिर करण्याची मागणी !

पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून ओला दुष्काळ जाहिर करण्याची केली मागणी

बोदवड, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधि | सर्वत्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असुन प्रत्येक उमेदवार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आपल्या प्रचारात व्यस्त आहेत. कमी वेळात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा उमेदवारांचा यावेळात प्रयत्न असतो
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडी तर्फे रोहिणी खडसे यांना उमेदवारी जाहीर झालेली असुन त्यांनी काल गुरुवारला आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असुन त्या सुद्धा प्रचाराला लागल्या आहेत.

आज शुक्रवार रोजी त्या बोदवड तालुक्याच्या प्रचार दौऱ्यावर असताना बोदवड वरून शेलवड कडे जाताना पावसामुळे शेतातील पिकांचे झालेले नुकसान बघून रोहिणी खडसे यांनी आपला प्रचाराचा ताफा शेताकडे वळव शेती पिकाच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना धिर दिला आणि शेतकऱ्यांच्या प्रति असलेली आपली संवेदनशीलता दाखवून दिली.

यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या, बोदवड तालुक्यात झालेल्या परतीच्या सततच्या संततधार पावसामुळे ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे यामुळे शेतकरी बांधव अडचणीत सापडले असुन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडी शेतकरी बांधवां सोबत आहोत.
सरकारने आचारसंहिता शिथिल करून या संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे अशी आपली मागणी असल्याचे सांगितले.

यापूर्वी सुद्धा आपण निवेदनाद्वारे मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे ओला दुष्काळ जाहिर करण्याची मागणी केलेली आहे परंतु त्यावर सरकारने कोणतेही पाऊले उचलले नाहीत पुढे बोलताना त्या म्हणाल्या, गेल्या महिन्या भरापासून सुरू असलेल्या परतीच्या संततधार पावसामुळे शेतात कापणी केलेला मका आणि सोयाबिनला कोंब फुटून पिके जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहेत यामुळे शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. तर कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट होऊन  जेमतेम उत्पादन होऊ शकेल अशी परिस्थिती असताना सततच्या संततधार पावसामुळे फुटलेला कापुस खाली लोंबकळून त्याला कोंब फुटले आहेत तर कैऱ्या काळवंडून सडत आहेत त्यामुळे शेतकरी बंधूंचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असुन शेतकरी बांधवांचा या खरिप हंगामात बि बियाणे किटकनाशके खते यांच्यावर झालेला खर्च सुद्धा निघणे अवघड झाले आहे.

ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी बांधवांचे दिवाळे निघाल्याने शेतकरी बांधव आर्थिक गर्तेत सापडला आहे
सरकारने आचारसंहिता बाजुला सारून सरसकट ओला दुष्काळ जाहिर करून या गंभिर संकटात शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे राहून शेतकरी बांधवांना आधार दयावा तसेच शेतकरी बांधवांनी बोदवड तालुक्यात मोठ्या क्षेत्रावर केळी पिकाची लागवड केली असुन
पिक विमा योजनेसाठी आवश्यक असलेल्या क्षेत्रा एवढी हि लागवड असल्या कारणाने बोदवड तालुक्याचा केळी पिक विमा योजनेत समावेश करावा पिक विमा कंपन्यांनी अजुनही नुकसानीचे पंचनामे केलेले नसुन पिक विमा कंपन्यांना नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे निर्देश द्यावेत अशी आपली मागणी असल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले.

शेतातील नुकसानीची पाहणी केल्या नंतर रोहिणी खडसे यांनी शेतकरी आणि पदाधिकाऱ्यांसह बोदवड तहसिल कार्यालय गाठून सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्या बाबत तहसीलदार यांना निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना(उबाठा) महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!