जळगाव मध्यम प्रकल्प अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हतनूर धरण परिसरातील शेकडो झाडांची अवैध कत्तल
सावदा, ता. रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l हातनुर धरणावरील नवीन आठ वक्र दरवाजे बांधकामासाठी
हतनूर धरणाच्या कार्यालय परिसरात शेकडो झाडांची अवैध कत्तल केली जात असून हा भाग जळगाव मध्यम प्रकल्प – २ यांचे अखत्यारीत येत असून त्यांचे कडे वर्ग करण्यात आला आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या जातीच्या झाडांवर कुऱ्हाड चालवली गेली आहे. यामुळे पर्यावरण प्रेमींनी मोठी नाराजी पसरली आहे.
या आधी येथून चार ते पाच ट्राका जळाऊ माल भरून गेला आहे. धरणामध्ये प्रचंड गाळ साठला असून हा काळ काढण्यासाठी नव्याने आठ वक्र दरवाजाचे बांधकाम हतनुर धरणाजवळ सुरू आहे. तसेच बांधकामात अडचण ठरत असल्याच्या नावाखाली झाडांची कत्तल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे वृक्ष तोडून परवाना न घेता या लाकडांची ट्रक द्वारे वाहतूक विनापरवाना झाला असल्याचा आरोप केला जात आहे .या संदर्भात कार्यकारी अभियंता भोसले यांचेशी संपर्क साधला असता ते फोन रिसिव्ह करीत नाही.
हतनुर धरणा शेजारील हतनूर धरण जलसंपदा विभाग यांच्या कार्यालयाच्या आवारातील वेगवेगळ्या जातीच्या शेकाडो झाडांची कत्तल करण्यात आली असून झाडांचे मूल्यांकन केलेले नसून फॉरेस्ट डिपार्टमेंट ची परवानगी नसल्याची माहिती मिळत आहे. हा प्रकार कार्यकारी अभियंता जळगाव मध्यम प्रकल्प – २ यांचे आशीर्वादाने सुरू आहे.
वृक्षतोड केल्यानंतर जवळपास चार ते पाच ट्रक लाकडे भरून वाहतूक केल्याची माहिती परिसरातील रहीवाशांनी दिली. परंतु वाहतुकीसाठी कोणताही परवाना मुक्ताईनगर वन विभागाकडून घेण्यात आला नसल्याच सांगितलं जातंय. यात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचीही मोठी चर्चा सुरू आहे.
दरम्यान, याच ठिकाणी एका पत्रकाराने तेथे गोंधळ घडल्याने चार ते पाच दिवसांपासून काम बंद आहे. जर परवानगी घेऊन वृक्ष तोड सुरू असती तर काम बंद का केले? . मिळालेल्या माहिती नुसार संबंधित ठेकेदार मुक्ताईनगर येथे परवानगी घेण्या साठी संबंधित अधिकाऱ्यांकडे चकरा मारीत आहे. अधिकारी सुटीवर असल्याने परवानगी मिळत नसल्याची माहिती मिळत आहे.