उप प्रादेशिक परिवहन विभागाच्या आशीर्वादाने जळगाव जिल्ह्यामध्ये विनापरवाना दुचाकी वाहन विक्रेत्यांकडून ग्राहकांची आर्थिक लूट
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज, अक्षय काठोके l जळगाव जिल्हयात ३० ते ४० दुचाकी वाहन विक्री परवानाधारकांची नियुक्ती करण्यात आलेली असून याच परवानाधारक शोरुममधून दुचाकी विक्री करणे बंधनकारक आहे परंतु जिल्हयात कोणताही परवाना नसतानासुद्धा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या आशीर्वादाने सब डिलरशीपच्या नावाने अंदाजे १५० विनापरवाना दुचाकी वाहन विक्रेते व्यवसाय करीत असल्याची चर्चा आहे ३० ते ४० परवानाधारक दुचाकी वाहन विक्रेते असून प्रत्येक तालुका तसेच बऱ्याच खेडोपाड्यांमध्ये जवळपास १५० विनापरवाना प्रत्येक तालुक्यात बेकायदेशीर वाहन विक्री करून शासनाची दिशाभूल करुन उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या भागीदारीने सर्वसामान्य जनतेची आर्थिक पिळवणूक करीत आहेत.
मुक्ताईनगर शहरमध्ये अथवा तालुक्यामध्ये दुचाकीचे हिरो शोरूम विना परवाना दुचाकी वाहन विक्रेते दुचाकी खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची आर्थिक पिळवणूक करीत आहेत अवैधरित्या प्रत्येक डीलर सबडीलर यांच्याकडून शोरूम चार्जेस, डिलेवरी चार्जेस ,प्रोसेसिंग फी/एग्रीमेंट असेसरीस,इन्शुरन्स, हेल्मेट या नावाखाली प्रत्येक दुचाकी खरेदी करणाऱ्या ग्राहकांकडून जवळपास १० हजार रु.एवढा न लागणारा चार्जेस आकारले जात आहे.
गोर गरीब जनता आर्थिक हतबलतेमुळे फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन दुचाकी खरेदी करत असताना डीलर,सबडीलर फायनान्स कंपन्यांना दुचाकी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एग्रीमेंट चार्जेस च्या नावाखाली जवळपास ८% ते १०% चार्जेस घेण्यास भाग पाडत आहे व हे अधिक घेतलेले पैसे डीलर व सबडीलर व परिवहन अधिकाऱ्यांच्या खिशात जात आहे.
तसेच प्रत्येक दुचाकीवर मूळ बिलात १८% जीएसटी लागू झाल्यानंतरही फायनान्स कंपन्यांकडून डीलर ,सब डिलर, परिवहन अधिकारी यांच्या संगनमताने ८% ते १०% प्रोसेसिंग फी अँग्रिमेंट चार्ज च्या नावाने उकळल्या जाणाऱ्या एग्रीमेंट चार्ज वर १८% जीएसटी तसेच फायनांसच्या रकमेवरील पुन्हा १८% जीएसटी वसूल केला जातो विनापरवाना तसेच परवानाधारक दुचाकी वाहन विक्रेते एवढ्यावरच थांबले नसून असेसरीस घेणे बंधनकारक केले आहे, इन्शुरन्स सब डीलर सांगेल त्याच कंपनीकडून घेणे बंधनकारक केले आहे, RTO अधीकारी गाडी पासिंग करत नाही असे सांगून बोगस दर्जाचे हेल्मेट हे आमच्याकडूनच घ्यावे लागेल व बाहेरील आणलेले चालणार नाही. अशी शक्कल लढवत हेल्मेटही निकृष्ट दर्जाचे देऊन अव्वाच्या सव्वा किंमत वसूल केली जात आहे त्यामुळे दुचाकी ग्राहकांची फार मोठ्या प्रमाणात आर्थिक लुट होत आहे.
जिल्ह्यातील विना परवाना दुचाकी वाहन विक्री तात्काळ थांबून फायनान्स कंपन्यांच्या माध्यमातून होणारी दुचाकी खरेदीदार ग्राहकांचे आर्थिक लुट थांबवून दुचाकी ग्राहकांना दिलासा द्यावा व उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी व विना परवाना दुचाकी विक्री करणारे शोरूम तात्काळ बंद करावे अशी अपेक्षा ग्राहक बाळगत आहे.
शोरूम मधून हेल्मेट घेण्याची सक्ती का? ग्राहक हा बाहेरून सुद्धा हेल्मेट विकत घेऊ शकतो परंतु मुक्ताई नगर शहरांमध्ये हेल्मेट ची सक्ती केली जात आहे ग्राहकाकडे अगोदर हेल्मेट असताना देखील नवीन बाईक घेताना तुम्हाला हेल्मेट घ्यावे लागेल अशी देखील सक्ती करण्यात येते त्यामागे आरटीओचे कारण दाखवले जात आहे आरटीओ गाडी पासिंग करणार नाही याची भीती दाखवून जबरदस्ती त्यांच्या मस्तकी बोगस हेल्मेट मारले जात आहे परंतु जवळच असलेल्या बुलढाणा जिल्ह्यांमध्ये अथवा इतर जिल्ह्यांमध्ये हेल्मेटची सक्ती नसून एकच महाराष्ट्र असून त्या मध्ये जिल्हा जिल्ह्यांमध्ये फरक का सब डीलरला विक्री परवाना नसताना देखील वाहने बिनधास्त विक्री सुरू आहे यामागचे कारण देखील गुलदस्तातच बंद असल्याचे दिसून येत आहे.
हिरो अथवा होंडा हे वाहन फायनान्स करताना फायनान्स वाल्या एक्झिक्यूटिव्ह ला सांगण्यात येते कि डाऊन पेमेंट मध्ये अतिरिक्त पैसे तुम्हाला लावावेच लागतील त्या शिवाय आमच्या शोरूम ला तुम्ही बसू शकणार नाही शोरूम चार्ज च्या नावाखाली अतिरिक्त पैसे लावले जातात जो व्यक्ती गाडी फायनान्स करत आहे त्याला याची कुठलीही कल्पना नसते व त्याचाच फायदा शोरूम मालक घेत असतात. हिरो, होंडा अथवा इतर नामांकित कंपन्या डीलर अथवा सब डीलर यांना कुठलेही अतिरिक्त चार्जेस घ्यायला सांगत नाही तरीसुद्धा या कंपन्यांचे डीलर सब डीलर मन मर्जीने फायनान्स कंपन्यांन सोबत जबरदस्तीने संगणमत करून किंवा जो आम्हला दुचाकी घेणाऱ्या व्यक्तीकडून जास्त चार्जेस देईल तोच बिजनेस करेल
मागेही या संदर्भात डॉक्टर विवेक सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेऊन आरटीओ अधिकाऱ्यांच्या दालनात काळे झेंडे दाखवून तक्रार केली होती. बेकायदेशीर दुचाकी वाहनांची विक्री सुरू असल्याची तक्रार स्वाभिमानाचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांनी परिवहन आयुक्तांकडे केलेली होती उपप्रादेशिक परिवहन विभाग यांच्याकडे वारंवार तक्रारी आंदोलन केल्यानंतरही परिवहन विभागाकडून आर्थिक हितसंबंध साधुन सदर विनापरवाना दुचाकी वाहन विक्रेत्यांना अभय व आशीर्वाद दिले जात आहे.
मुख्यमंत्री,परिवहन आयुक्त यांच्याकडे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांनी मागील घेतलेल्या पत्रकार परिषदेत मागणी केलेली होती यासंदर्भात अद्यापही कुठलीही कारवाई जिल्हाभरामध्ये झालेली दिसून येत नाही
RTO विभागाकडून कारवाई होणार कां? RTO विभाग अश्या बोगस विना परवाना दुचाकी डीलर वर कारवाई करून जनतेची लूट होणारी कधी थांबणार या कडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.
ज्यादा चार्जेस घेत असल्यास आपण जागरूक नागरिक म्हणून Hiro अथवा Honda दुचाकी कंपनीच्या कस्टमर केअर शी संवाद साधून या संदर्भात आपण तक्रार दाखल करू शकता अथवा कंपनीच्या ईमेल आयडीवर वर मेल सुद्धा आपण करू शकतो याबाबत कंपनीला काहीही माहित नसते व कंपनीचा बिजनेस या संदर्भात कमी होत असतो