भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राष्ट्रीय

ATM मधून पैसे काढतायं, मग आता जास्त पैसे मोजावे लागतील?

नवी दिल्ली, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l एटीएममधून आता पैसे काढताना फी म्हणून जास्त पैसे द्यावे लागण्याची शक्यता आहे. कारण, देशातील एटीएम ऑपरेटर रोख रक्कम काढण्यासाठी इंटरचेंज फी वाढवण्याची मागणी करत आहेत. त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशी (आरबीआय) संपर्क साधून हे शुल्क वाढवण्याची मागणी केली आहे. आतापर्यंत एटीएममधून पैसे काढण्यासाठी १५ ते १७ रुपये फी आकारली जात होती. आता ती २३ रुपयांपर्यंत वाढू शकते. कॉन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्री (सीएटीएमआय) प्रति ट्रॅन्झॅक्शन २३ रुपये फी वाढवण्याचं समर्थन करत आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आपल्या व्यवसाय सुरळीत सुरू ठेवण्यासाठी अधिक निधी उभारण्यासाठी सीएमटीएमआय अशी मागणी करत आहे.

इंटरचेंज रेट दोन वर्षांपूर्वी वाढवण्यात आले होते.  एजीएस ट्रान्झॅक्ट टेक्नॉलॉजीजचे कार्यकारी संचालक स्टॅनली जॉन्सन यांनी सांगितलं,पुढे  ते म्हणाले, “आम्ही याबाबत आरबीआयशी बोलत आहोत. सेंट्रल बँक आमचा मुद्दा विचारात घेत असल्याचं दिसत आहे. सीएटीएमआयने प्रत्येक ट्रॅन्झॅक्शनसाठी २१ रुपये आकारण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तर काही इतर एटीएम उत्पादकांनी २३ रुपये आकारण्याची मागणी केली आहे.” जॉन्सन असंही म्हणाले, “शेवटची फी वाढ काही वर्षांपूर्वी करण्यात आली होती. आता सर्वजण एकत्र आले आहेत. त्यामुळे फी वाढीस मंजुरी मिळण्यास फारसा वेळ लागणार नाही.

२०२१ मध्ये एटीएम ट्रॅन्झॅक्शन फी १५ रुपयांवरून १७ रुपये करण्यात आली होती. दुसऱ्या एका एटीएम निर्मात्याने देखील जॉन्सन यांच्या म्हणण्याला दुजोरा दिली आहे. हा निर्माता म्हणाला, “इंटरचेंज रेट वाढवण्यासाठी सध्या चांगली लॉबी तयार झाली आहे. याबाबत एक शिष्टमंडळ एनपीसीआयकडे पाठवण्यात आलं आहे. बँकांनीही या वाढीस सहमती दर्शवली आहे.” कार्ड इश्यु करणाऱ्या बँकेकडे ही फी भरावी लागते. ज्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढले जातात त्या बँकेकडे ही फी जाते. ग्राहकांकडून आकारण्यात येणारी प्रतिट्रॅन्झॅक्शन फी २० रुपयांवरून २१ रुपये करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!