भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

सुप्रिम कोर्टाची बनावट नोटीस पाठवून अटक करण्याची धमकी देत महिलेची २५ लाखांची फसवणूक

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगाव शहरातील महिलेला मुंबई सायबर पोलीस असल्याची बतावणी करून इंटरपोल, सीबीआय आणि सुप्रीम कोर्टाची बनावट नोटीस पाठवून यातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी २५ लाखांची मागणी करून खात्यावर टाकायला लावून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली.

जळगाव शहरातील एका महिलेला व्हाटसअपवरुन व्हॉइस कॉल तसेच व्हिडिओ व नॉर्मल कॉल आणि मेसेज करुन बनावटी सुप्रिम कोर्ट नोटीस तसेच इंटरपोलच्या नावाची रेड नोटीस तसेच गोपनीयता कायम ठेवण्यासाठी सीबीआयची नावाची नोटीस, व्हाटसअपद्वारे  असे सगळे बनावटी कागदपत्र  पाठवून प्रविणकुमार, के.सी. सुब्रमन्यम, प्रदिप सांवत, आणि संदिप राव असे नाव सांगणारे अनोळखी सायबर ठगांनी महिलेला अटक करण्याची भीती दाखवली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देत महिलेला सगळ्या केस मधुन बाहेर पडण्याचे खोटे आश्वासन देत इन्सपेक्शन फीच्या नावाखाली २५ लाख रुपये एका बँक खात्यात टाकायला सांगितले.

घाबरलेल्या महिलेने पैशांची व्यवस्था करून सांगितलेल्या खात्यावर २५ लाख रुपये जमा केले. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने सदर महिलेने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तक्रारदार महिलेच्या तक्रारीवरून जळगाव सायबर पोलिसात प्रविणकुमार, के सी सुब्रमन्यम, प्रदिप सांवत्, आणि संदिप राव असे नाव सांगणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सतिश गोराडे हे करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!