भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

नाशिक

व्यायाम करतांना तोल गेल्यामुळे गच्चीवरून पडून महिलेचा मृत्यू

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मंडे टू मंडे न्युज, प्रतिनिधी : सकाळी उठल्यानंतर नेहमीप्रमाणे अगोदर गच्चीवर जाऊन व्यायाम करणे, योगा यांसाठी गेलेल्या नाशिकमध्ये अशोकस्तंभ परिसरात ४८ वर्षीय महिलेचा व्यायाम करताना गच्चीवरून पडल्यामुळे मृत्यू झाला आहे.

याबाबत अधिक असे, नाशिकमध्ये अशोकस्तंभ परिसरात ४८ वर्षीय प्रिया सतीश मटुमल ही महिला कुटुंबासोबत राहत होती. रोजच्याप्रमाणे ती सकाळी उठून व्यायाम आणि योगा करण्यासाठी गच्चीवर गेली. मात्र गच्चीवर व्यायाम सुरू असताना तिचा अचानक तोल गेला. या गच्चीत ज्या भागात प्रिया व्यायाम करत होती, तिथे कठडा नसल्याची प्राथमिक माहिती आहे. व्यायाम करताना अचानक तिचा तोल गेल्यामुळे ती गच्चीवरून थेट खाली कोसळली.

तोल गेल्यानंतर प्रियाने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. गच्चीवरून थेट खाली पडू नये, यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यावेळी तिच्या हाती काहीच लागलं नाही. तोल गेल्यामुळे ती सरळ गच्चीवरून जमिनीवर आपटली. या घटनेत जखमी झालेल्या प्रियाला उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं. या घटनेनं गटुमल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!