महिलेला इच्छेविरुद्ध वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले, पती – पत्नीचा पर्दाफाश
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |चोपडा तालुक्यातील अडावद येथे एका धक्कादायक घटनेत एका पीडित महिलेला पती व पत्नीने तिच्या इच्छेविरुद्ध वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले आणि तिच्या कमाईवर आपली उपजीविका चालवली. या गंभीर प्रकरणात पोलिसांनी ‘अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम’ अंतर्गत चोपडा तालुक्यातील धानोरा येथील रहिवासी असलेले चंद्रकांत सुपडू सोनवणे (वय ४५) आणि त्यांची पत्नी शीला चंद्रकांत सोनवणे (वय ४२) या पती-पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मूळची येलदरी, जि. हिंगोली येथील रहिवासी असलेल्या पीडित महिलेला आरोपींनी त्यांच्या धानोरा येथील घरी आणले होते.आरोपी पती-पत्नीने पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिला वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले.आरोपी चंद्रकांत सोनवणे हा पीडितेच्या कमाईवर आपले पोट भरत असल्याचे कारवाईदरम्यान स्पष्ट झाले.
अडावद पोलीस स्टेशन ला या घटनेची फिर्याद दाखल करण्यात आली.सोमवारी, १७ नोव्हेंबर रोजी दुपारी अडावद पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध ‘अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम’ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गंभीर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ हे करीत आहेत.


