यावल येथे महिलेचा विनयभंग : तरुणां विरोधात गुन्हा
यावल, मंडे टू मंडे वृत्तसेवा : शहरातील एका भागातील कटलरीचे दुकान ३१ वर्षीय महिलेचा शुक्रवारी १० डिसेंबर रोजी सायंकाळी विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली असून त्याच्यावर यावल पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शहरातील एका भागात कटलरीचे दुकान असलेल्या ३१ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह राहिवासास आहे. संशयित आरोपी पंकज रमेश सोनवणे (वय-३१) रा. वढोदा ता. यावल हा तरुण १० डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास महिलेच्या दुकानावर आला. त्याने आठ दिवसांपुर्वी घेतलेली वस्तू परत करण्यासाठी आला. यात वाद झाल्यानंतर त्याने महिलेला एक मोबाईल नंबरची चिठ्ठी दिली. तसेच म्हणाला की, ‘माझ्याशी मैत्री कर असे सांगून त्याने लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. हा प्रकार सहन न झाल्याने महिलेने यावल पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी तरूणीच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी पंकज सोनवणे यांच्या विरोधात यावल पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.