महिलेची २ लाख ६१ हजारांची सोन्याचे दागिने फैजपूर- मुक्ताईनगर बस मधून लंपास
सावदा, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l फैजपूर-मुक्ताईनगर बस मधून चांगदेव कडे प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील २.६१ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची धक्कादायक घटना २४ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.
मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथील रहिवासी वंदना सुपडू बोदडे. वय ४८ वर्ष. ही महिला फैजपूर-मुक्ताईनगर बस मध्ये सावदा बसस्थानकावरून चांगदेवला जाण्यासाठी बसल्या होत्या. यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या ताब्यातील एकूण किंमत २,६१,८०७ रुपये असलेली सोन्याचे दागिने, त्यात ७.११० ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडल आणि २४.७४० ग्रॅम वजनाचे मंगलपोत, एकूण ३१.८५० ग्रॅम सोने चोरून नेली .
या प्रकरणी सावदा पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे हे करीत आहेत.