क्राईमजळगाव

ब्रेकिंग | पहेलगाम दहशदवादी हल्यात जळगाव जिल्ह्यातील महिला सुखरुप !

जळगाव, मंडे टू मंडे न्यूज प्रतिनिधी | जम्मू काश्मीर येथिल पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील २ व इतर महिला मैत्रिणीं पर्यटक अडकून पडल्या होत्या त्यासंदर्भात मोठी माहिती समोर येत असून सुदैवाने या हल्ल्यात त्यांना कोणतीही इजा झाली नसून त्या सुखरूप असल्याची माहिती येथे अडकून पडलेल्या सौ नेहा वाघुळदे यांचे पती पत्रकार तथा कलावंत तुषार वाघुळदे यांनी मंडे टू मंडे न्यूज़ ला दिली आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे आज सायंकाळच्या सुमारास दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केल्याने २५ पेक्षा जास्त पर्यटक ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. यात जखमींमध्ये महाराष्ट्रातील काही पर्यटकांचा समावेश असल्याची माहिती आधी जाहीर करण्यात आली असून यातील दोघांचा मृत्यू झाल्याचेही काही वृत्तवाहिन्यांवरून सांगितले जात आहे.

पहलगाम येथे दहशद वाद्यकंडून गोळीबार झाला तेव्हा जळगाव येथील पत्रकार तथा कलावंत तुषार वाघुळदे यांच्या सौभाग्यवती नेहा वाघुळदे या आपल्या मैत्रीणींच्या ग्रुपसह तेथे उपस्थित होत्या. त्यांनी चार वाजता तुषार वाघुळदे यांना कॉल करून आम्हाला लष्कराच्या लोकांनी घेरले असल्याचे सांगितले. यानंतर त्यांचा फोन बंद झाला असून त्यांच्याशी संपर्क न झाल्यामुळे वाघुळदे हे काळजीत होते. शेवटी , रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांचा सौ. नेहा वाघुळदे यांच्याशी संपर्क झाला. यात त्यांनी त्या सुखरूप असल्याचे सांगितले. तर नेहा वाघुळदे यांच्या सोबत जिल्ह्यातील त्यांची एक मैत्रीण आणि इतर शहरांमधील अन्य मैत्रीणीदेखील या हल्ल्याच्या प्रसंगी तेथे हजर होत्या व त्या सर्व जणी सुरक्षीत असल्याची माहिती तुषार वाघुळदे यांनी मंडे टू मंडे न्यूजशी बोलतांना दिली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!