भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावशैक्षणिकसामाजिक

जागतिक महिला दिनी शेठ ला.ना. विद्यालयात महिलांचा सन्मान

महिलांनी स्वतःला ओळखून आपला सर्वांगीण विकास करून समाज विकासात प्रमुख भूमिका निभवावी – प्रा.डॉ.नूतन पाटील

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगांव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला.ना. सा.विद्यालयात शनिवार दिनांक 8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या सुरुवातीस आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले ,लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर,देवी सरस्वती यांच्या प्रतिमेस प्रमुख अतिथी प्रा.डॉ.नूतन पाटील ,शिक्षण प्रसारक मंडळाच्या समन्वयीका सौ.विजयालक्ष्मी परांजपे,शाळेचे मुख्याध्यापक सचिन देशपांडे,उपमुख्याध्यापक श्री संजय भारुळे, जेष्ठ पर्यवेक्षक प्रशांत जगताप, संजय वानखेडे यांच्या हस्ते माल्ल्यारपण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद पाटील यांनी

प्रमुख अतिथी यांचा परिचय पांडुरंग सोनवणे यांनी करून दिला.या वेळेस प्रमुख अतिथींचे स्वागत पुष्पगुच्छ व लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावरील कादंबरी कर्मयोगिनी हे पुस्तक देऊन करण्यात आले.या प्रसंगी शालेय विद्यार्थी वेदिका चौधरी,कुमुद चव्हाण, सुगंधा धनगर, आराध्या अठवाल, योगिता वाणी,तेजल सोनवणे, मुस्तफा पिंजारी, जयेश लोहार, यांनी थोर समाजसुधारक आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले,पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाऊ, कवयित्री बहिणाबाई चौधरी,पहिल्या महिला पोलीस आयुक्त किरण बेदी, यांच्या वेशभूषा करून त्यांच्या जीवन कार्याची माहिती दिली.

यावेळेस प्रमुख अतिथी यांचे हस्ते शाळेतील 50 शिक्षिका व शिक्षकेतर महिला भगिनी यांचा सत्कार गुलाबपुष्प, भेटवस्तू(पर्स ) देऊन करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख अतिथी प्रा.डॉ.नूतन पाटील यांनी उपस्थित विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींना मार्गदर्शन करतांना सांगितले की महिलांनी आपल्या स्वतःतील बलस्थाने ओळखून सर्वांगीण विकास करावा व समाज विकासात प्रमुख भूमिका निभविण्याचे आवाहन केले.

या  प्रसंगी मयूर पाटील व श्रीमती संपदा छापेकर यांनी स्त्रीशक्ती वंदना गीत सादर केले.या वेळेस महिलांच्या वतीने सरकारबद्दल सौ.पद्मजा जोशी यांनी ऋण व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सोमनाथ महाजन यांनी तर आभारप्रदर्शन जगदीश साळुंखे यांनी केले.वंदेमातरम ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी विशेष परिश्रम घेतले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!