रावेरसामाजिक

तांदलवाडी येथे पनामा रोगावर कार्यशाळा

बलवाडी, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज. आशीष चौधरी | रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथील ग्रामपंचायत मध्ये मंगळवारी संध्याकाळी पनामा ह्या केळी वरील अतिशय घातक रोगविषयी कार्यशाळा आयोजित करण्यात असली होती.१९२० साली पनामा देशातून ओळख पटलेल्या केळी पिकासाठी अतिशय नुकसान कारक आणि घातक असा पनामा हा रोग आता भारतात शिरकाव झाल्याने महाराष्ट्र शासन तसेच कृषी विभाग ऍक्शन मोड वर आले आहेत.जवळील राज्य गुजरात,बिहार मधील काही भागात या रोगाने थैमान घातले आहे. ज्या भागात ह्या रोगाने शिरकाव केला तिथे पुढची ३०-४० वर्षे केळी पीक होत नाही.


पाल कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ महेश महाजन यांनी रोगाबद्दल विस्तृत आणि महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली.रोग येण्याआधीचा प्रतिबंधक उपाय, विविध प्रकारच्या उपाय योजना औषधे व्यवस्थापन आदींबद्दल ची सखोल माहिती दिली.


तांदलवाडी येथील कृषितज्ज्ञ, कृषिभूषण पुरस्कार प्राप्त तसेच महाजन बनानाचे संचालक सदानंद (प्रेमानंद)महाजन यांनी त्यांचा फिलिपिन्स ह्या देश दौऱ्यात पनामा रोगाने झालेली हानी तसेंच त्या रोगाची विदारक सत्यता शेतकऱ्यांसमोर मांडली. आपल्याला भविष्यात येणाऱ्या ह्या रोगाबद्दल कसे तयार राहायचे आहे हेही त्यांनी सांगितले. रोजगार हमी योजने बद्दलची माहिती तांदलवाडी कृषी सहाय्यक अविनाश थोरात यांनी सांगितली.कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे समाधान कृषी पर्यवेक्षक सावदा सचिन गायकवाड यांनी केले.

कार्यक्रमासाठी कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी सावदा येथील भालचंद्र ढाले, कृषी सहायक राजेंद्र ढाके, तांदलवाडी कृषी सहाय्यक अविनाश थोरात, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक रावेर येथील चंद्रकांत माळी, तसेच शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त व महाजन बनानाचे संचालक प्रशांत महाजन, आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त व ग्रा सदस्य शशांक पाटील ,डॉ एल जी पाटील, दिलीप पाटील,एकनाथ पाटील, डॉ.प्रकाश पाटील,राहुल पाटील, दिपक चौधरी, सुयोग चौधरी, सुधाकर पाटील, चंद्रकांत पाटील, अशोक पाटील, रितेश पाटील, योगेश महाजन, प्रभाकर महाजन, आशिष पाटील, अरविंद पाटील, गजानन पाटील, चंद्रकांत वाघ, यश पाटील आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!