शेठ ला.ना.सा.विद्यालयात वैदिक अंकगणित या विषयावर कार्यशाळा संपन्न
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगांव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला.ना. सा.विद्यालयात शनिवार दिनांक 18 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता वैदिक अंकगणित या विषयावरील कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.
सुरुवातीस कार्यशाळेचे मार्गदर्शक प्रा.श्री.जितेंद्र पाटील सर यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन देशपांडे सर यांचे हस्ते विद्यार्थी निर्मित पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. या प्रसंगी प्रा. जितेंद्र पाटील सर यांनी गणितातील मोठ्या संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार , भागाकार, वर्ग, वर्गमूळ, घनमूळ सोप्या पद्धतीने कसे काढावे यावर मार्गदर्शन केले. तसेच कमी वेळेत जास्त उदाहरणे कशी सोडवावित यावर सोदाहरण मार्गदर्शन केले.
या वेळेस शाळेतील काही विद्यार्थांनी उदाहरणे सोडवून दाखविली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक संजय भरुळे, पर्यवेक्षक संजय वानखेडे, पांडुरंग सोनवणे, गौरव देशमुख, भगवान बारी, उल्ल्हास ठाकरे , श्रीमती अमला पिंपळे, पंकज महाले आदींचे सहकार्य लाभले.