भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

सावदा ब्राह्मण हितवर्धिनी समिती तर्फे विश्व ब्राह्मण दिवस उत्साहात साजरा

सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | आचार्य चाणक्य यांच्या सन्मानार्थ 1 जून विश्व ब्राह्मण दिवस 2021 पासून नियमित पणे साजरा केला जातो, तसा यावर्षी देखील सावदा येथे समितीचे सचिन सकळकळे यांच्या अध्यक्षतेखाली किरण कुळकर्णी यांच्या भोईवाडा येथील निवास स्थानी ब्राह्मण हितवर्धिनी तर्फे मोठ्या उत्साहात साजरी केली गेली.


यावेळी निलेश कुळकर्णी आणि किरण कुळकर्णी यांच्या हस्ते सपत्नीक भगवान परशुरामाच्या प्रतिमेचे पूजन करून हनुमान चालीसाचे पठण केले गेले. नंतर प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता केली गेली. यावेळी समाज संगठनाची गरज असल्याचे मत समितीचे अध्यक्ष सचिन सकळकळे यांनी बोलून दाखविली.


यावेळी निलेश महाराज कुळकर्णी, धनश्री कुळकर्णी, रितेश सकळकळे, श्रीकांत मटकरी, सानिका मटकरी, दिपक कुळकर्णी, प्रदीप कुळकर्णी,किरण कुळकर्णी, कविता सकळकळे आदी सदस्य उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!