ऐनपूर येथे मरी मातेचा यात्रोत्सव संपन्न
ऐनपुर, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज. प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील ऐनपूर येथे मरीआई मातेच्या यात्रे निमित्त अक्षय तृतीयाच्या दुसर्या दिवशी आर्थात १ मे रोजी बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
ही यात्रा शेकडो वर्षापासुन सुरु असुन या दिवसी संध्याकाळी सहा वाजता भगत सोपान नामेदव भिल्ल यांनी बारागाड्या ओढल्या. भगताचे बगले म्हणुन महेंद कोळी, सुनिल महाजन, विजय भिल्ल, संदिप जैतकर ईश्वर भिल्ल. मोहन पाटील आदि सहकार्य केले . या वर्षी बारागाड्या आढण्याच्या जागेत बदल करण्यात आला होता. पूर्वी मिरी मातेच्या मंदिरा जवळ बारा गाड्या ओढल्या जात होत्या. परंतु या वर्षी खिर्डी रस्त्यावर ओढल्या गेल्या. वर्षभर गावाबाहेर कामानिमित्त गेलेले लोक या दिवसी यात्रा बाघण्यासाठी मोठ्या संख्येने येतात.
यात्रेत खेळण्याची दुकाने पाळणे मोठ्या प्रमाणात येत असतात. या वर्षी यात्रेसाठी प्रथमच ७० स्वयंसेवकाची नियुक्ती केली होती त्यात अध्यक्ष जितु कोळी, गोलु पाटील तसेच तंटामुक्ती समिती . अध्यक्ष काशिनाथ शामु पाटील व सर्व सदस्य व ऐनपुर सरपंच अमोल महाजन, उपसरपंच पवन पाटील तलाठी ग्राम विकास अधिकारी मंडळ अधिकारी .व सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील यांनी सहकार्य केले तसेच निंभोरा पोलिस ठाण्याचे सपोनि हरिदास बोचरे याच्या मार्गदर्शना खाली अबास तडवी यानी चोख बदोबस्त केला तसेच पत्रकार व गावातील लोक बहुसंख्येने उपस्थित होते.