भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

यावल तालुक्यात ६० हजारांचा गुटखा जप्त, गुन्हा दाखल, फैजपूर सहाय्यक पोलीस अधीक्षकांच्या पथकाची कारवाई

फैजपूर,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क/ यावल तालुक्यातील फैजपूर येथून जवळच असलेल्या न्हावी गावातील किराणा दुकानातून ६० हजारांचा गुटखा जप्त केल्याने गुटखा तस्करात मोठी खळबळ उडाली असून याप्रकरणी यावल तालुक्यातील न्हावी येथील संशयित सुनील अशोक माखीजा वय ४१ वर्ष, याच्याविरोधात फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली. सदरची कारवाई फैजपूर सहाय्यक पोलीस अधीक्षकांच्या पथकाने केली.

फैजपूरच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या पथकाला न्हावी येथील किराणा दुकानात साठवलेल्या गुटख्याच्या साठ्याबाबत माहिती मिळाल्यानंतर पथकाने मंगळवारी रात्री अकरा वाजेच्यां सुमारास कारवाई करीत विमल पानमसाला, करमचंद पानमसाला, राजश्री पानमसाला, राजनिवास सुगंधी पानमसाल्याचा एकूण ५९ हजार ८०६ रुपयांचा साठा जप्त केला. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती .याप्रकरणी सुनील माखीजा, रा.न्हावी यांच्या विरोधात कॉ.अल्ताफ अली हसन अली यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स पो नि निलेश वाघ करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!