क्राईमरावेर

यावल तालुक्यातील सराईत गुन्हेगारास गावठी पिस्तूल सह अटक, रावेर तालुक्यातील घटना

रावेर/ मुंजलवडी. मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी.चंद्रकांत वैदकर l गावठी कट्टा (पिस्तूल) घेऊन येणाऱ्या यावल तालुक्यातील वढोदा येथील तरुणांस रावेर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून दहा हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. हा तरुण मध्यप्रदेशातून पाल मार्गे महाराष्ट्रात येत होता.

एक व्यक्ती गावठी पिस्तूल घेऊन मध्यप्रदेशातून पाल मार्गे महाराष्ट्रात येत असल्याची माहिती रावेर पोलिसाना मिळाली. त्या नुसार रावेर पोलिसांनी पाल जवळील शेरी नाका येथे नाकाबंदी करून सापळा रचला, शुक्रवारी मध्यरात्री पावणे चार वाजेच्या सुमारास एक व्यक्ती संशयस्पद स्थितीत फिरताना आढळून आला असता त्याची अंगझडती घेतली असता दहा हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल मिळून आले. हे पिस्तूल पोलिसांनी जप्त केले असून आरोपी भरत गणेश सोनवणे, वय ३२ वर्ष. रा वढोदा ता यावल जि जळगाव याला अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाईत पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल, उप निरीक्षक तुषार पाटील गुन्हे शोध पथकाचे पोलीस कर्मचारी समाधान ठाकूर, सचिन घुगे, प्रमोद पाटील, विकार शेख यांचा सहभाग होता.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!