यावल तालुक्यात बारा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
यावल ,मंडे टू मंडे वृत्तसेवा। येथून जवळच् असलेल्या साकळी येथील बारा वर्षीय अल्पवयीन मुलीचा शेतात विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील साकळी येथील रहिवासी व मुळ मध्यप्रदेशात राहणाऱ्या आदिवासी मजूर कुटुंबियातील बारा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना आज दुपारी उघडकीला आली. फिर्यादीत माझी बारा वर्षीय अल्पवयीन बहीण तिच्या बहिणी सोबत शेतात गेलेली असताना. त्या ठिकाणी सखाराम उर्फ अक्रम मानसिंग भिलाला याने माझ्या बहिणीस शेतात ओढत कपाशीच्या शेतात नेऊन विनयभंग केला.अशी फिर्याद पिडीत मुलीच्या भावाने दिल्याने यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी संशयीत आरोपी सखाराम उर्फ अक्रम मानसिंग भिलाला ,रा. वराडसीम, ता. भुसावळ अटक करून त्यांच्यावर बाल लैंगिक अत्याचार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
.