१४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळविले
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
यावल ,मंडे टू मंडे वृत्तसेवा। यावल शहरात वास्तव्यास असलेल्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा प्रकार २५ डिसेंबर शनिवार रोजी उघडकीला आला.
या बाबत अधिक माहिती अशी की,यावल शहरातील एका भागात राहात असलेल्या एका १४,वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची धक्कादायक घटना काल शनिवार २५ डिसेंबर रोजी घडली ,मुलीच्या नातेवाईकानी गावात व परिसरात शोधा शोध केली असता कुठेच शोधून न मिळाल्याने या प्रकरणी काल सायंकाळी यावल पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.