भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

प्रेम प्रकरणातून तरूणाचे घर जाळण्याच्या प्रकरणात अ‍ॅट्रॉसिटीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल.

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

यावल (प्रतिनिधी)। तालुक्यातील चुंचाळे येथील प्रेम प्रकरणातून तरूणाचे घर जाळण्याच्या प्रकाराला कलाटणी मिळाली असून आता संबंधीत तरूणीने त्या तरूणासह कुटुंबियांवर अ‍ॅट्रॉसिटीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, चुुंचाळे येथे प्रेम प्रकरणातून एका तरूणाने घर जाळण्याचा प्रयत्न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याच प्रकरणात क्रॉस कंप्लेंट दाखल करण्यात आली आहे. यात चुंचाळे गावातील एका तरूणीशी गावातीलच राहणार्‍या एका तरूणाने मेत्रीपुर्ण संबध ठेवुन वारंवार त्या तरूणीचा आर्थिक व मानसिक छ्ड व विनयभंग करून जातीवाचक बोलुन शिवीगाळ करून लज्जा वाटेल असे कृत केले म्हणुन यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल पोलीसां कडून मिळालेल्या अधिक माहीतीनुसार यावल तालुक्यातील चुंचाळे येथे राहणारी २८ वर्षीय तरूणी हे संगमेश्‍वर जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी पोलीस शिपाई म्हणुन कार्यरत आहे. गावातीलच राहणारा शरद अशोक पाटील यांने फिर्यादी तरूणीशी २०१४ते १८ / १ / २०२१पर्यंत संगमेश्‍वर जिल्हा रत्नागिरी ते चुंचाळे गावात मैत्रीपुर्ण संबंध प्रस्थापीत करून वारंवार फिर्यादी पोलीस शिपाई तरुणी कडील मोबाईल तपासणीसाठी मागतो या कारणावरून फिर्यादी तरूणीस शिवीगाळ , दमदाटी करून धमकी देवुन विनयभंग करून पैशांची मागणी करून मानसिक छळ केला. तसेच तरूणी ही आपल्या मुळ गावी आली असता संशयीत शरद अशोक पाटील यांने व इतर ५ते ७ जणांनी संगनमताने सदर तरूणी शेतात आपल्या आईचा जेवणाचा डबा घेवुन जात असतांना विनयभंग केल्याने तरुणीच्या फिर्यादीवरून शरद अशोक पाटील, कल्पना अशोक पाटील , आशा शरद पाटील, बायजाबाई पाटील, जनाबाई पाटील, पुनम स्वप्नील पाटील आणी स्वप्नील पाटील सर्व राहणार चुंचाळे तालुका यावल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास विभागीय पोलीस अधिकारी नरेन्द्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक सुधीर पाटील, पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार हे करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!