अल्पवयीन मुलीचा विनयभंग, यावल येथे गुन्हा दाखल
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
यावल,मंडे टू मंडे वृत्तसेवा। येथील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना २ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता यावल शहरात घडली.
या बाबत अधिक माहिती अशी ,आपल्या परिवारासह यावल शहरात रहात असलेली १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी येथीलच साने गुरूजी विद्यालयात शिक्षण घेत असून संशयित आरोपी संदीप धनराज सोनवणे रा. यावल हा गेल्या चार महिन्यांपासून अल्पवयीन मुलाचा पाठलाग करत घराजवळ चकरा मारत होता. काल शनिवार २ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याचे पाहुन संशयित आरोपी संदीप सोनवणे याने घरात घुरून मुलीशी अंगलट करून छेडछाड केली सदरील प्रकार हा मुलीने आपल्या नातेवाईकांना सांगितल्याने याप्रकरणी अल्पवयीन पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात रात्री उशिरा संशयित आरोपी संदीप सोनवणे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.