यावल तालुक्यात विधवा महिलेचा विनयभंग,गुन्हा दाखल
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
यावल,मंडे टू मंडे वृत्तसेवा। यावल तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या विधवा महिलेचा घरात घुसून अश्लील भाष्य व शिवीगाळ करून विनयभंग केल्याची तक्रार विधवा महिलेने यावल पोलीस स्टेशनला केली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील एक ४० वर्षीय विधवा महिला आपल्या परिवारासह राहत असता गावातील संशयित आरोपी फिरोज हुसेन पिंजारी हा मंगळवार २३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता महिला घरात एकटी असतांना महिलेच्या घरात माचिस मागण्याच्या उद्देशाने घरात घुसून, मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझे पती वारले आहे असे बोलून अंगलट केले. महिलेने विरोध केला असता फिरोज पिंजारी याने अश्लिल शिवीगाळ करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याने महिलेच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी फिरोज पिंजारी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.