भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

तरुणीचा विनयभंग प्रकरणी यावल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

यावल (प्रतिनिधी)। तालुक्यातील किनगाव येथील एका व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी तरुण महीलेचा विनयभंग केल्याने यावल पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

यावल पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील किनगाव येथील रमेश विकास कोळी यांच्या घरासमोर १४ जानेवारीला रात्री प्रदीप ईच्छाराम कोळी यांनी एका २३ वर्षीय फिर्यादी महीले सोबत असलेल्या तरुणीस रस्त्याने जात असतांना तीला धक्का मारून तिचा हात पकडून तरूणीच्या मनास लज्जा वाटेल असे कृत केल्याने १५ जानेवारीला यासंदर्भात पीडित तरुणीच्या नातेवाईक महीलेने फिर्याद दिल्याने यावल पोलीस स्टेशनला विनयभंग केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दरम्यान, सदरील घटनेने गुन्ह्यातील संशयीत आरोपी प्रदीप कोळी व पत्नीस एका गटाकडून बेदम मारहाण करण्यात आल्याने दोघही जळगाव येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल आहे, यात संशयीत आरोपी प्रदीप कोळी यांची पत्नीची प्रकृती गंभीर असल्याचे समजत असून पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सुनिल तायडे हे करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!