मद्यार्काची तस्करी : यावल-चोपडा रस्त्यावर ३ लाखाचे मद्यार्क जप्त
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
यावल, मंडे टू मंडे वृत्तसेवा। राज्य उत्पादन शुल्कच्या भुसावळ विभागाने यावल-चोपडा रस्त्यावर मोहराळा फाट्याजवळ ३ लाख १३ हजार रुपयांचे मद्यार्क जप्त केले.
यावल-चोपडा रस्त्यावर मद्यार्काची तस्करी होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या भुसावळ विभागाला मिळाली असता प्रभारी निरीक्षक सी. एच. पाटील, जयराम जाखेरे, के. एन. बुवा, सत्यविजय ठेंगडे, आनंद पाटील, मधुकार वाघ, जी. एस. पाटील, विठ्ठल हटकर, यशोधर जोशी, भुषण वाणी, अजय गावंडे, विपुल राजपूत, मुकेश पाटील यांनी मोहराळा फाटा येथे वाहनांची तपासणी केली असता एमएच १८ एए ६०४८ क्रमांकाच्या मालवाहु वाहनातून सहा ड्रम भरुन मद्यार्क वाहुन नेत असल्याचे आढळुन आले.अधिक तपासणी केली असता ड्रममध्ये मद्यार्क असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार वाहनचालक योगशे संजय पाटील,रा. पाडळसा, ता. यावल,याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्कचा भुसावळ विभाग पुढीत तपास करीत आहे.