संतापजनक ; यावल तालुक्यात ३ वर्षाच्या मुलीवर २५ वर्षाच्या नराधमाचा अत्याचार
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
यावल,मंडे टू मंडे वृत्तसेवा। यावल तालुक्यातील दहिगाव येथे भाडेकरुच्या ३ वर्षाच्या मुलीवर २५ वर्षाच्या नराधमाने अत्याचार केल्याचा भयंकर व संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. .
पोलीस सूत्रां कडून मिळालेल्या माहितीनुसार, दहिगाव येथे एक कुटुंब भाड्याच्या घरात राहतात.दरम्यान
घर मालकाचा मुलगा कैलास प्रल्हाद पाटील ,वय २५ याने काल सायंकाळी चार ते पाच वाजेच्या दरम्यान भाडेकरूंच्या तीन वर्षाच्या मुलीला दहा रूपये देण्याचे आमीष दाखवून घरात नेले. आणि तिच्यावर अत्याचार केला. बालिकेची आई घरी आली असता हा सर्व प्रकार तिच्या लक्षात आल्याने तिने कैलासच्या कानशिलात लगावली असता त्याने तेथून पळ काढला .
पीडित मुलीच्या कुटुंबाने आज या बाबत यावल पोलिस स्टेशनला फिर्याद दिल्याने कैलास प्रल्हाद पाटील ,वय२५, रा. दहीगाव, ता. यावल, याच्या विरूध्द भादंवि कलम ३७६, ३७६-अ, ३७५, ३५४, तसेच पोक्सो कायद्यातील कलम ३, ४ आणि ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला