यावल येथील सराफा पेढी लूट प्रकरणातील दुसऱ्या आरोपीस अटक
Monday To Monday NewsNetwork।
यावल(प्रतिनिधी)। येथील गजबजलेल्या बाजारपेठेतील बाजीराव काशिनाथ कवडीवाले सराफा यांच्या सराफा दुकानात ७ जुलै रोजी मानेवर बंदुक ठेवत चार दरोडेखोरांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण १२ लाखांचा मुद्देमाल लुटून नेला होता. भर दिवसा घडलेल्या या थरारक घटनेमुळे यावलसह परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. यातील पहिल्या संशयित आरोपीस काल अटक केली होती. तर आज भुसावळातून दुसरा संशयित आरोपीला अटक केली आहे.
बाजीराव काशिनाथ कवडीवाले सराफा पेढीवरील दरोडा प्रकरणी पोलीस ठाण्यात अटक केलेल्या संशयित आरोपी निवृत्ती उर्फ शिवा हरी गायकवाड यास गुरुवारी न्यायालयात उपस्थित केले असता गायकवाड यास 22 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान याच गुन्ह्यातील दुसरा संशयित आरोपी चंद्रकांत उर्फ विकी लोणारी यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथकाने अटक करून यावल येथील पोलिसांच्या ताब्यात दिले असून पुढील तपास सुरू आहे.