यावल येथे विवाहितेचा एक लाखासाठी छळ,सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
यावल,मंडे टू मंडे वृत्तसेवा। यावल तालुक्यातील साकळी येथील विवाहितेला सासरच्या मंडळी कडून १ लाखासाठी छळ होत असल्याची घटना समोर आली.
या बाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील साकळी येथील माहेर असलेल्या शमिमबी शेख अनवर,वय-२२ हिचा विवाह यावल शहरातीलच आयशा नगरातील शेख अनवर शेख मुसा यांच्याशी २०१९ मध्ये रितीरिवाजानुसार झाला. लग्नाचे काही महिने चांगले गेल्यानंतर विवाहितेचा पती शेख अनवर शेख मुसा याने विवाहितेला माहेरहून १ लाख रूपये आणण्याची मागणी केली. विवाहितेच्या आईवडीलांची परिस्थिती हालाखीची असल्याने पैश्यांची पुर्तता करू शकत नाही असे सांगितल्यावर विवाहितेला सासू व सासरे, जेठ आणि जेठाणी यांनी शिवीगाळ, मारहाण व दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत घरातून हाकलून दिले. शेवटी या छळाला कंटाळून विवाहिता मोहरी निघून येऊन सोमवारी ३ जानेवारी रोजी रात्री १० वाजता यावल पोलीसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात पती शेख अनवर शेख मुसा, सासरे शेख मुसा शेख कादर, सासू नमजाबी शेख मुसा, जेठ शेख मोमीन शेख मुसा आणि जेठाणी नसीमबी शेख मोमीन सर्व रा. आयशानगर, यावल यांच्यावर यावल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.