माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या यावल तालुका अध्यक्षपदी चेतन चौधरी
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
आमोदा ता.यावल,मंडे टू मंडे वृत्तसेवा। माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या यावल तालुका अध्यक्ष पदी आमोदे येथील चेतन चौधरी यांची नियुक्ती झाली. मुंबई येथील कार्यालयात कार्यकर्ता महासंघाच्या राज्यस्तरीय बैठकीत पदाधिकारी निवड समितीच्या शिफारशीनुसार माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या यावल तालुका अध्यक्ष पदी चेतन चौधरी यांच्या नावाची घोषणा संस्थापक अध्यक्ष श्री सुभाष बसवेकर यांनी नियुक्ती पत्र देऊन केली. केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम २००५ हा जनसामान्यांचा कायदा आहे,या कायद्याचा वापर करून प्रशासन पारदर्शी , लोकाभिमुख व भ्रष्टाचार मुक्त ठेवण्याचा प्रयत्न करणे हाच आपला उद्देश आहे असे निवडीनंतर चेतन चौधरी यांनी व्यक्त केले.
केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम २००५ हा कायदा १२ ऑक्टोबर, २००५ रोजी अंमलात आला. शासनयंत्रणेतील व्यवहारात पारदर्शकता यावी, भ्रष्टाचाराचे समूळ निर्मूलन व्हावे, प्रशासकीय कार्यपद्धती, नियम व इतर शासकीय कामांमध्ये गैरव्यवहारास वाव राहू नये, शासकीय कार्यपद्धतीबद्दल सामान्य जनतेला साशंकता वाटू नये व त्यांची कामे विनाविलंब, सहजगत्या व्हावीत यासाठी ‘माहितीचा अधिकार’ या कायद्याची निर्मिती झाली. केंद्रसरकारने ऑक्टोबर २००५ मध्ये हा कायदा करून सर्व देशभर हा कायदा लागू केला.
गेले कित्येक वर्षापासूनचे चेतन चौधरी यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत यावल तालुका अध्यक्ष पदी सर्वानुमते त्यांची नियुक्ती करण्यात आली.चेतन चौधरी यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.