भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

शेतीच्या वाटणीचा वाद : महिलेसह मुलाला मारहाण करून विनयभंग

यावल, मंडे टू मंडे वृत्तसेवा :  तालुक्यातील एका गावातील शेतीच्या वाटणीवरून महिलेसह तिच्या मुलाला मारहाण करून धमकी देत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली असून याप्रकरणी यावल पोलीसात चार जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, २१ नोव्हेंबर रोजी सकाळी शेतीच्या हिस्से व वाटणीवरून गावातील नातेवाईक असलेले चार जणांनी तालुक्यातील एका गावातील ४४ वर्षीय महिला व तिच्या मुलाला शिवीगाळ करून मारहाण केली. यातील एकाने महिलेचा पदर ओढून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केल्याचा प्रकार घडला.

तसेच शेतीचा हिस्सा मागाल तर तुमच्या दोघांचा मुडदा पाडू, तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी महिलेस देण्यात आली. याप्रकरणी यावल पोलीस स्थानकात महिलेच्या फिर्यादीवरून अखेर मंगळवार ५ एप्रिल रोजी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार अजिज हमीद शेख करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!