भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

प्रेमसंबंधाच्या वादातून तरुणांवर चाकू हल्ला : प्रकृती गंभीर !

यावल, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा : शहरातील एका २२ वर्षीय तरूणावर गावांतील एका महिलेशी असलेल्या प्रेमसंबंधाच्या वादातून तिक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना रात्री घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

यावल शहरातील काजीपुरा पटेलवाडा भागात राहणारा जावेद युनूस पटेल (वय-२२) हा तरूण राहतो. गेल्या काही दिवसांपासून त्याचे गावातील एका महिलेचे प्रेमसंबंध होते. यादरम्यान त्यांचा वाद झाला महिलेने फोन करून बोलावले यात फैजपूर येथील अनोळखी तीन जणांनी जावेद याला गोड बोलून दुचाकीवर बसवून भुसावळ रोडवरील पीर बाबा दर्गाजवळ जावेदवर तीन जणांनी चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केले. रहदारीच्या वाहनांना पाहून घटनास्थळाहून तीनही संशयित आरोपी हे फरार झाले. दरम्यान मध्यरात्री जावेद जखमीवस्थेत पडलेला दिसून आल्याने त्याला तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले

मात्र, प्रथमोपचार करत प्रकृती गंभीर असल्याने त्याला ताडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर विभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक अशित कांबळे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले असून प्रेमप्रकरणातून हा जीवघेणा हल्ला झाला असल्याचा आरोपी जखमी जावेदच्या नातेवाईकांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!