भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

दहीगावात संचारबंदी, चुकीचा निर्णय घेणाऱ्या पो.नि. माणगावकर यांच्या पथकाला धक्काबुक्की, पोस्टर विटंबनेचा संशय, ६ संशयित ताब्यात !

पोस्टर विटंबनेचा संशय,एका गटाचा पोलीस ठाण्यात ठिय्या तर दुसऱ्या गटाचा दहीगावात संताप.

यावल, मंडे टू मंडे न्युज सुरेश पाटील | तालुक्यातील दहिगाव येथे बुधवार दि. ७ रोजी रात्री मिरवणूक निघाली असता या मिरवणुकीचा समारोप झाल्यानंतर कुंभारवाड्यातील काही जणांनी मिरवणुकीतील सहभागी तरुणाने महापुरुषाच्या पोस्टरची विटंबना केल्याचा आरोप केल्यामुळे दोन गटात मोठा वाद निर्माण झाला. रात्री सहा संशयतांना यावल पोलिसांनी ताब्यात घेतली यानंतर काल गुरुवारी सकाळी एका गटातील महिला व पुरुषांनी पोलीस ठाण्यात जाऊन आपले म्हणणे मांडले तर दुसऱ्या गटाने दहिगाव पोलीस चौकी समोर उपोषण सुरू करून वाहनांचे टायर पेटवून गाव बंदची घोषणा दिली या प्रकरणी काल दि.८ रोजी रात्री उशिरापर्यंत एका गटाकडून ६ तर पोलिसांकडून ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस पथकाला धक्काबुक्की — दहिगाव येथील मुख्य चौकात रस्ता अडवून बसलेल्या नागरिकांची समजूत काढण्यासाठी गेलेल्या यावल पोलीस पथकाला जमावाने धक्काबुक्की केल्याने या प्रकरणी यावल पोलिसांनी ४० जणांनी विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणला म्हणून व इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दहिगाव येथे बुधवारी काढलेली मिरवणूक कुंभारवाडा भागातून पुढे गेल्यावर समारोप झाला दरम्यान कुंभारवाडा भागात महापुरुषाच्या पोस्टरची विटंबना केल्याचा आरोप मिरवणुकीतील काही कार्यकर्त्यांवर करण्यात आला यावरून दोन गटात वाद झाले ही माहिती मिळताच रात्री अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, फैजपुरच्या डीवायएसपी अन्नपूर्णा सिंग पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर हे पथकासह गावात दाखल झाले त्यांनी दोन्ही गटात शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला रात्री २ वाजेपर्यंत गावात बंदोबस्त होता तसेच खबरदारी म्हणून पोस्टरच्या विटंबनाच्या संशयावरून ६ संशयीतांना ताब्यात घेतले,

या घटनेत मात्र ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या एकतर्फी कारवाई बाबत तीव्र संताप व्यक्त केला परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची समजूत काढून शांतता प्रस्थापित केली.आणि खबरदारी म्हणून पोस्टरच्या विटंबनेच्या संशयावरून ६ संशयतांना ताब्यात घेतली यानंतर काल गुरुवार दि.८ रोजी गुरुवारी सकाळी एका गटातील महिला पुरुषांनी पोलीस ठाणे गाठून निष्पाप तरुणांना ताब्यात घेतल्याचा आरोप करून तीव्र संताप व्यक्त केला.आणि दहिगावातील सीसीटीव्ही फुटेज पाहून, तपासून जो कोणी दोषी असेल त्यांना अटक करा अशी मागणी केली. आणि दुसरीकडे दुसऱ्या गटाने दहिगावात चौकात टायर जाळून गावबंदची संताप जनक घोषणा केली, शेकडो महिलांनी उपोषण करून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या दुपारी चार वाजता पोलीस अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आली. रस्ता मोकळा केला याप्रकरणी एका गटाकडून दाखल होण्यास साधनांना ताब्यात घेण्यात आले तर शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून ४० जणांविरुद्ध यावल पोलिसांनी उपस्थित अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे दाखल केले आहे .

४८ तासाची संचारबंदी— दहीगावातील तणावाची आणि स्फोटक परिस्थिती लक्षात घेता प्रभावी प्रांताधिकारी अर्पित चव्हाण यांनी गुरुवार दि.८ रोजी सायंकाळी १९:३० वाजेपासून पुढील ४८ तासासाठी गावात संचारबंदी लागू करण्याचे आदेश काढले संचार बंदीच्या काळात राज्य राखीव पोलीस दलाकडून चूक बंदोबस्त ठेवण्यात आला होता आणि आहे. वरिष्ठ अधिकारी दही गावात तळ ठोकून— यावल पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांना दही गावातील परिस्थिती हाताळताना आल्यामुळे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते,डीवायएसपी अन्नपूर्णा सिंग भुसावळ डीवायएसपी, एलसीबीचे कर्तव्यदक्ष असे नजनकुमार पाटील, प्रभारी प्रांताधिकारी अर्पित चव्हाण, यावल येथील तहसीलदार सौ. मोहनमाला नाझिरकर,रावेर येथील तहसीलदार बंडू कापसे,यावल जळगाव, फैजपूर,चोपडा,अडावद या ठिकाणची पोलीस पथकाचा दहीगावात कडक पोलीस बंदोबस्त आहे.

मनमानी व कायद्याचा धाक दाखवणाऱ्या पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी बदली— यावल तालुक्यातील दहीगावातील तणावाच्या पार्श्वभूमीवर तसेच या आधी नगर जिल्ह्यात वादग्रस्त ठरून निलंबित झाल्यानंतर यावल पोलीस स्टेशनला बदली होऊन आलेले पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांची आज तडकाफडकी पोलीस मुख्यालयाच्या नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली.जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी उशिरा का होईना परंतु चांगला निर्णय घेतल्याने यावल पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात पोलीस दलाविषयी सकारात्मकरित्या बोलले जात आहे त्यांच्या जागी प्रभारीपदी रावेरचे सपोनि हरीष भोये यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या अंगावर बांगड्या फेकून त्यांच्या चुकीच्या निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त करून त्यांना संताप जनक निरोप दिल्याचे यावल पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात बोलले जात आहे या घटनेमुळे तालुक्यातील पोलीस दलात एका अधिकाऱ्याच्या अंगावर बांगड्या फेकून निषेध केल्याची ही यावल तालुक्याच्या इतिहासातील पहिली घटना आहे.यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

बुधवार दि.७ रात्री दहीगावत दोन समुदायांमध्ये तणाव— यावल तालुक्यातील दहिगाव येथे परवा रात्री दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला असता पोलीस प्रशासनाने तात्काळ धाव घेत वातावरण नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या चुकीच्या नियोजनामुळे परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली आणि काल गुरुवार दि.८ रोजी दिवसभर गावात मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते,दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून सहायक जिल्हाधिकारी तथा फैजपुरचे प्रभारी उपविभागीय अधिकारी अर्पित चौहान यांनी दहिगावात गुरूवार ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजेपासून ४८ तासांसाठी संचारबंदी लागू केली आहे.या संदर्भातील निर्देश जारी करण्यात आले आहेत.संचारबंदीच्या कालावधीत कुणालाही घराबाहेर पडता येणार नसून अत्यावश्यक सेवां वगळता सर्व दुकाने व व्यावसायिक प्रतिष्ठाने देखील बंद राहणार आहेत. फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ (१) अन्वये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर कंट्रोलरूमला जमा— या दंगलीच्या विषयाला घेवून यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांची जळगाव येथील पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.त्यांच्या जागी रावेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष भोये यांची प्रभारीपदी नियुक्त करण्यात आली आहे.अशी माहिती विश्वसनिय सुत्रांकडून मिळाली आहे.या बदलीमुळे जळगाव जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असली तरी येत्या लोकसभा विधानसभा निवडणुका लक्षात घेता राजकीय वर्तुळात याबाबत समाधानकारकरित्या बोलले जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!