भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्ययावलसामाजिक

जिल्हाधिकारी जळगाव यांच्या हस्ते डांभुर्णी प्रा.आ.उपकेंद्रास २ ऑक्सीजन काँन्सनट्रेटर लोकार्पण !

यावल (सुरेश पाटील)। तालुक्यातील डांभुर्णी ग्रामपंचायत सरपंच तथा सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष पुरुजित चौधरी यांनी 14 व्या वित्त आयोग निधीतून डांभुर्णी येथील प्रा.आ.उपकेंद्रास 2 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटरचे लोकार्पण जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.

दिनांक 12 सप्टेंबर शनिवार रोजी दुपारी डांभुर्णी येथे जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बि.एन.पाटील यांनी जिल्हा सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा डांभुर्णी ग्रामपंचायत सरपंच पुरूजीत गणेश चौधरी यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायत मार्फत १४ व्या वित्त आयोगा निधितून प्रा.आ.उपकेंद्रास २ ऑक्सिजन कॉन्सनट्रेटरचे लोकार्पण जिल्हाधिकारी अभिजित राऊत व मुख्य कार्यकारी अधिकारी बि.एन. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आँक्सीजन काँन्सनट्रेटर आरोग्य उपकेंन्द्राला भेट देणारी डांभुर्णी ग्रामपंचायत ही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत आहे असे म्हणत जिल्हाधिकारी जळगाव यांनी डांभुर्णी ग्रामपंचायत सरपंच पुरूजित चौधरी यांचे जनहिताचे व आरोग्य हिताचे निर्णयाचे /कार्याचे कौतुक करुन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी ” माझे कुटुंब माझी जबाबदारी ” या अभियाना बाबत माहिती दिली व प्रत्यक्ष फिल्डवर जावुन माहिती दिली.तसेच डांभुर्णी जि.प.मराठी शाळेचे उप शिक्षक विनोद मनोहर सोनवणे यांना सन २०१९-२० चा जिल्हा शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.

जिल्ह्यातील सरपंच यांना आवाहन-

ऑक्सिजन काँन्संटेटर मशीन
भारतातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता यापुढे आपल्याकडील परिस्थिती गंभीर होऊ शकते प्रसंगी ऑक्सिजन सिलेंन्डर सर्वत्र उपलब्ध होणे कठीण होईल म्हणून आपण जर ऑक्सिजन कॉन्संटेटर मशीन घेऊन आरोग्य उपकेंन्द्राला दिली तर पेशंट स्टबीलाईज करता येईल व जिवनदाई ठरेल तसेच सर्व ग्राम पंचायतींनी जर हे मशीन घेतले तर शासकीय यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होईल म्हणून मी जिल्ह्यातील व यावल तालुक्यातील आमच्या सर्व सरपंच बधुंना आव्हान करतो की सर्वांनी हे मशीन १४ व्या वित्त आयोगातुन कोरोनासाठी असलेल्या राखीव निधीतुन घेऊन ग्रामस्थांचे आरोग्य हित जपावे असे आवाहन सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष पुरूजित चौधरी यांनी केले आहे.
यावेळी यावल पंचायत समिती सभापती सौ.पल्लवीताई पुरूजीत चौधरी,जिल्हा वैद्यकीय आधिकारी डॉ.दिलीप पोटोडे,प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले,किनगांव प्राथमिक आरोग्य केंन्द्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ.मनिषा महाजन, डांभुर्णी ग्रामपंचायत सरपंच पुरूजीत चौधरी,तहसीलदार जितेंद्र कूवर,गट विकास अधिकारी डॉ.निलेश पाटील,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.हेमंत ब-हाटे तसेच तालुक्यातील सरपंच व ग्रामस्थ व इतर नागरिक अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!