आरोग्ययावलसामाजिक

यावल येथे लोकवर्गणीच्या ऑक्सीजन पाईपलाईनचे जिल्हाधिकारी यांच्याहस्ते लोकार्पण !

यावल (सुरेश पाटील)। कोरोनाचा विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी या कार्यक्रमांतर्गत आपण कोरोना महामारीच्या युध्दात जिंकण्यासाठी सामाजिक जबाबदारी स्विकारा असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.

यावल येथे आज लोकसहभागातून ऑक्सीजन पाईप लाईनचे लोकर्पण जिल्हाधिकरी अभिजित राऊत यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
वाढत्या कोरोना विषाणू संसर्गबाधित रुग्णांना तात्काळ ऑक्सिजन पुरवठा व्हावा यासाठी प्रांत डॉ.अजित थोरबोले व यावल तहसीलदार जितेंद्र कूवर यांच्या प्रयत्नातून तालुका सरपंच संघटना व इतर संघटना तसेच लोकसहभागातून येथील ग्रामीण रुग्णालयात 30 बेडसाठी ऑक्सिजन पाईप लाईन करण्यात आली आहे. या पाईपलाईन चे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी एन पाटील यांनी सांगितले की संकट समयी नागरिकांचे जिव वाचविण्यासाठी आर्थिक सहकार्य करणाऱ्यांना दानशूर नव्हे तर जीवनदाते म्हणावे लागेल, नागरिक आणि प्रशासनाच्या एकजुटीने आणि सहकार्याने आपण संघर्ष करून कुठल्याही कोणत्याही संकटावर विजय मिळू शकतो असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

ऑक्सीजन पाईपलाईनचे लोकार्पण कार्यक्रमात प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, तहसीलदार जितेंद्र कूवर,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारीअधिकारी डॉ.बी.एन.पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप पाटोडे, गटविकास अधिकारी डॉ.निलेश पाटील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.हेमंत बराटे, जिल्हा परिषद गट नेते प्रभाकर अप्पा सोनवणे, यावल पंचायत समिती सभापती सौ.पल्लवी चौधरी, सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष पुरूजीत चौधरी, पंचायत समिती गटनेते शेखर सोपान पाटील, यावल नगराध्यक्षा सौ.नोंशाद तडवी, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार उर्फ मुन्ना पाटील, यावल ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ.बी.बी.बारेला, नावरे येथील सरपंच समाधान पाटील,ग्रामीण रुग्णालयातील औषध निर्माण अधिकारी सूर्यकांत पाटील, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी नानासाहेब घोडके इत्यादी तालुक्यातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी आपल्या पोलिस बंदोबस्त चोख ठेवला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अजित थोरबोले यांनी केले तर आभार तहसीलदार जितेंद्र कूवर यांनी मानले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!