भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

प्रशासनयावल

परप्रांतीयांना घरकुलांचा लाभ नायगाव येथील ग्रामसेवकावर कार्यवाहीची मागणी !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन |

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील नायगाव येथील ग्रामसेवक मनमानी कारभार करीत असल्याची तक्रार उपसरपंचासह सहा सदस्यांनी जळगाव जिल्हा परिषद सिईओ कडे केलेली आहे यात विकासाचे कोणतेही काम करताना उपसरपंचासह सदस्याना विश्वासात घेत नाही,मनमानी करून सर्व निर्णय ते स्वतः घेतात, मासिक सभेला सुद्धा वेळेवर हजर राहात नाही व नंतर येऊन सर्व विषय त्यांच्या मर्जीनुसार प्रोसिडिंग वर नमूद करतात, मासिक सभेमध्ये मागील विषय घेत नाही, त्यामुळे यात काहीतरी घोटाळा आहे असे स्पष्ट होते, याबाबत विचारणा केली असतांना संबंधितांकडून अरेरावीची उत्तरे मिळतात. अशा प्रकारची लेखी तक्रार करण्यात आलेली आहे. तक्रारदारांनी ग्रामसेवक व सरपंचांच्या कारभाराविषयी अनेकदा वरीष्ठांकडे लेखी तक्रार अर्ज करून ही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही तरी सदर ग्रामसेवकांवर कारवाई कधी होणार ? असा प्रश्न नायगावकर ग्रामस्थांकडुन उपस्थित केला जात आहे.

याबाबत लेखी निवेदनानुसार सविस्तर असे की नायगाव ता.यावल येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या आर्थिक व्यवहाराबद्दल माहिती विचारली असता, ग्रामसेवक पी.डी.सैंदाणे यांचे कडून स्पष्ट नकार मिळतो. प्रत्येक प्रश्न हा लेखी अर्ज करूनच विचारावा असे ग्रामसेवकांचे म्हणणे आहे. तर मासिक सभेमध्ये झालेल्या खर्चाची बिले मागणी करूनही अवलोकनासाठी सभेपुढे ठेवत नाही. ग्रामपंचायतीचा कर- वसुली भरणा बँकेत केला जात नसून तो परस्पर खर्च केला जातो. त्यानुसार आम्ही सभेच्या अजेंड्यावर जमा-खर्च नमूद करण्याची मागणी केलेली आहे. ती सुद्धा मागणी अमलात आलेली नाही तसेच तसेच ग्रामपंचायतीच्या विविध विषयांची योग्य अशी माहिती मिळत नाही. कामापेक्षा जास्तीचा खर्च दाखवून बाकी रक्कम गहाळ केली जात आहे. ग्रामसेवक पी.डी.सैंदाणे हे मासिक सभेला गैरहजर राहूनही दडपशाही ने कारभार करतात या गैरकारभाररास त्वरित आळा बसावा व ग्रामसेवकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व बदली करण्यात यावी. या मागणीसाठी उपसरपंच सोनल रामदास पाटील यांच्यासह सहा ग्रामपंचायत सदस्यांनी केलेली आहे.दि.३१ मे २०२१ रोजी सदर तक्रारी निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद (जळगाव) यांच्याकडे देण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे सदर ग्रामपंचायतीच्या गैरकारभार विषयी संबंधित पदाधिकाऱ्यांनी दि.२९ जून २०२१रोजी तहसीलदार (यावल) यांच्याकडे सुद्धा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे या तक्रार अर्जात म्हटल्या,नुसार ग्रामपंचायतीच्या मालकीची शेती गट क्रं.२६९ अशी मालमत्ता आहे सदर शेताच्या बांधावर ७० ते ८० झाडे होती ग्रामपंचायत मध्ये ठराव घेतांना फक्त सदर झाडांच्या फांद्यांची छाटणी करायचे असे ठरले होते मात्र प्रत्यक्षात सरपंच व ग्रामसेवक पी.डी.सैंदाणे यांनी संगनमत करून सदर शेताच्या बांधावरील सर्व झाडे कुठलीही परवानगी न घेता तोडून टाकली आहे.

त्याचप्रमाणे यावल येथील गटविकास अधिकाऱ्यांना तब्बल तीन तक्रार अर्ज दिलेले आहे त्यात म्हटल्यानुसार असे की, मध्य प्रदेशातील परप्रांतीय रहिवासी असलेल्या आदिवासी बारेला कुटुंबियांच्या नावे घरकुल योजनेअंतर्गत काही घरकुल मंजूर करुन बांधकाम सुरू आहे तथापि सदरील बारेला कुटुंब यांचे गावाच्या मतदार यादीत सुद्धा नाव नाही व त्यांचा साधा रहीवास ही नाही अशा लोकांना घरकुल मंजूर करून गावातील पात्र लोकांना सरपंच व ग्रामसेवक पी.डी.सैंदाणे यांनी घरकुल योजनेपासून वंचित ठेवलेले आहे. त्याचप्रमाणे गावालगत निमछाव नावाची आदिवासी वस्ती उदयास आलेली असून या ठिकाणी बोगस घरकुलांची सर्रासपणे बांधकाम सुरू आहे तसेच पैशांची मोठ्या प्रमाणात देवाण- घेवाण सुद्धा झालेली असून एका घरकुला मागे २५ते ३० हजार रुपयांची वसुली या बोगस लाभार्थ्यांकडुन करण्यात आल्याचे वृत्त असुन याची देखील वरिष्ठांनी सखोल चौकशी करावी अशी दि.२३ जून २०२१ रोजीच्या निवेदनात मागणी केलेली आहे. असे अजब व गज़ब व्यवहार सदर ग्रामपंचायतीत सुरू आहे अशी रितसर तक्रार दि.२९ जून २०२१ रोजी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक पी.डी. सैंदाणे व सरपंच यांच्या गैरकारभाराविरुद्ध व उपसरपंच व सहा ग्रामपंचायत सदस्य यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी करूनही अद्याप कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही. तरी संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल अशी मागणी तक्रारदार पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे. ग्रा.पं.ची वरीष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी-संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक पी.डी. सैंदाणे व सरपंच यांच्या गैरकारभाराविरुद्ध उपसरपंच सौ सोनल रामदास पाटील तसेच उत्तम सपकाळे, ज्योती देशमुख, रमाबाई कोळी, राजू तडवी, महेंद्र तडवी, अलिशानबाई तडवी या सहा ग्रामपंचायत सदस्यांच्या लेखी तक्रारीवरून यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ निलेश पाटील व तर अधिकार्‍यांच्या पथकाने चौकशीसाठी दि.५ रोजी भेट देऊन संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली मात्र चौकशी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही


★ शिपाई चालवतात मासिक सभा-सदर
ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक पी.डी.सैंदाणे हे मासिक सभेला गैरहजर राहतात. यावेळी ते आपल्या गैरहजेरीत ग्रामपंचायत शिपाई यांना मासिक सभा घेण्यासंदर्भात सांगून जातात त्यानुसार सदर ग्रामपंचायतीची मासिक सभा शिपाई घेत असतात हे ग्रामपंचायतीचे फार मोठे दुर्दैव आहे. अशा या ग्रा.पं.च्या कारभाराकडून गावाच्या कुठल्या विकासाची अपेक्षा करावी ? असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. यासह ग्रामसेवक व सरपंच यांचे अनेक प्रकारचे गैरव्यवहार आम्ही लेखी निवेदनाद्वारे वरिष्ठ प्रशासनाकडे कळविले आहे मात्र अद्याप यावर कुठलीही ठोस कारवाई झाली नाही तथापि येत्या काळात सदर प्रकरणावर कुठलीही नि:पक्षपातीपणे कारवाई न झाल्यास आम्ही तक्रारदार सर्वजण जिल्हा परिषद ,जळगाव समोर आमरण उपोषण करू असे उपसरपंच सोनल रामदास पाटील यांनी सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!