क्राईमयावल

डोंगर कठोरा ग्रामपंचायत : ग्रामविस्तार अधिकाऱ्यास प्रांतची नोटीस !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मंडे टू मंडे न्युज : यावल तालुक्यातील डोंगर कठोरा ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत ग्रामपंचायत माध्यमातुन गाव हद्दीतील शासकीय जमीन ही रितसर गांवठाणाची कार्यवाही न करता भोगवटादार लावुन गांव नमुना ८ अ तयार केल्याबाबत फैजपुर विभागाचे प्रांतअधिकारी कैलास कडलग यांनी यावल पंचायत समितीचे ग्रामविस्तार अधिकारी व डोंगर कठोरा ग्रामपंचायतीस कार्यवाहीची नोटीस बजावत तीन दिवसात खुलासा सादर करावा असे आदेश देण्यात आले आहे.

यावल पंचायत समितीचे ग्रामविस्तार अधिकारी व डोंगर कठोरा ग्रामपंचायतीला मागील आठवड्यात फैजपूरचे प्रांताअधिकारी कैलास कडलग यांनी पाठवलेल्या पत्रानुसार, तालुका यावल डोंगर कठोरा या गावाच्या ग्रामपंचायत हद्दीत शासकीय जमीन असलेली गावठाणची जागेची रितसर परवानगी न घेता भोगवटादार लावुन गाव नमुना ८ अ तयार केल्याबाबत तक्रार प्राप्त झाली असून या अनुषंगाने तसेच सोबत डोंगर कठोरा येथील नमुना ८ अ ची संचिका दाखल आहे. या संदर्भात प्रांतधिकारी कैलास कडलग यांनी संबधीतांना नोटीस बजावुन संपुर्ण कागदपत्रांसह तिन दिवसाच्या आत हजर राहावे अशी सुचना देण्यात आल्या आहे. सदरचा खुलासा मुद्दतीत प्राप्त न झाल्यास आपल्याविरुद्ध कायद्याशीर कार्यवाही करण्यात येईल असा इशाराही नोटीसीव्दारे देण्यात आला आहे. 

मात्र, याप्रकरणी प्रांत कार्यालयाकडुन कुठल्या प्रकारची कार्यवाही करण्यात आली हे मात्र गुलदस्त्यातच आहे.  या विषयाला घेवुन डोंगर कठोरा ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांनी  अतिश्य बेजबाबदारीने वागुन ग्रामस्थांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळवुन देण्याच्या नांवाखाली मोठा आर्थिक व्यवहार करून, शासकीय नियम धाब्यावर ठेवुन हा गोंधळकृत कारभार केल्याची परीसरातील ग्रामस्थांमध्ये उलटसुलट चर्चेस उधाण आले आहे.  या सर्व कारभाराची सीईओ व गटविकास अधिकारी यांनी चौकशी करून सत्य काय ते समोर आणावे अशी मागणी विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रारीव्दारे करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!