“धूमस्टाईल” हातातील महागडा मोबाइल लांबविला;पोलिसांच्या वचकांवर प्रश्नचिन्ह ?
Monday To Monday NewsNetwork।
यावल ( प्रतिनिधी)। येथील पोलिस ठाण्याच्या पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आठवडे बाजारातील पेट्रोल पंपाजवळ एका मोबाईल धारकाचा मोबाईल मोटर सायकल वर स्वरांनी हातातून हिसकावून पळ काढला आहे ही घटना रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे. गेल्या तीन दिवसापूर्वी शहरात भर दिवसा सराफचे दुकानावर दरोडा टाकून साडेअकरा लाख रुपयांची लूट व त्या अगोदरच एक दिवस रस्त्यावर मिरची पूड टाकून 55 हजार रुपयांच्या लूट केल्याचा तपास सुरू असतानाच ही घटना घडल्याने शहरातील सुव्यवस्था बिघडली असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे
येथील आठवडे बाजारातील पेट्रोल पंपा समोरील शबनम दुध डेअरीचे चालक शेख दानिश शेख युसूफ हे रस्त्याने मोबाईलवर संभाषण करीत जात असतांना मागील बाजुने मोटरसायकल वरून येणाऱ्या अज्ञात चोरट्यांनी हातातुन२५ हजार रुपये किमतीचा महागडा मोबाईल घेवुन पोबारा केला . या बाबत शेख दानिश शेख युसुफ यांनी यावल पोलीसात मोबाईल चोरीस गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली असुन , पॅट्रोल पंपावरील लावण्यात आलेल्या सिसिटीव्हीच्या कॅमेऱ्यात मोबाइल चोरटे कैद झाले आहे .
गेल्या पाच-सहा दिवसांपासून शहरात अशा घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण तयार झाले आहे येथील मुख्य रस्त्यावरील बाजीराव काशिदास कवडी वाले यांचे दुकानात भर दिवसा दुपारी एक वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मोटरसायकलवरून साडेअकरा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला त्यापूर्वी एक दिवस आधी येथील सातोद रस्त्यावरील एका मोटर सायकल स्वार होऊन चोरट्यांनी 55 हजार रुपये लुटले होते तर तिसर्या दिवशी मोबाइल लांबविण्याच्या घटनांमुळे सर्वसामान्य नागरीकांपासुन व्यापारी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे .