भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलसामाजिक

विट भट्ट्याच्या वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; प्रांताधिकारी, मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

फैजपूर (प्रतिनिधी)। फैजपूर शहरात धाडी नदीत ते थेट आठवडे बाजार पर्यंत गेल्या काही वर्षांपासून विट भट्टी मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आल्या आहे. या विट भट्टीचे धुरामुळे संपूर्ण फैजपूर शहरातील वाढत्या प्रदुषण मुळे लक्कडपेठ, इस्लामपुरा, मिलतनगर, झोपडपट्टी भागातील रहिवासी यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

पश्चिमेकडे धाडी नदीच्या काठावर जिल्हा परिषद उर्दु प्राथमिक शाळा,पूर्वेकडील बाजूस बहिणाबाई चौधरी मराठी शाळा व हायस्कुल,फातेमा उर्दू गर्ल हायस्कुलच्या सर्व विद्यार्थ्यांचा या भागातून सतत वापर आहे.वीट भट्टीचे धुरामुळे प्रदूषणात वाढ होत असल्याने या विद्यार्थीचे आरोग्याचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
सदर नदीमध्ये वीटभट्टी लावण्यासाठी मान्यता आहे का ? शासनाने यांना परवानगी दिली आहे का ? व पर्यावरण विभाग कडून परवानगी मिळाली आहे का ? असा प्रश्न शहरातील विद्यार्थ्यांचे पालक वर्ग,नागरिका मध्ये आहे.

फैजपूर परिसरात मिल्लत नगर येथे वाढती लोकसंख्या मुळे या लोकांचे आरोग्याचे काय होणार ? हा मोठा प्रश्न आहे. तरी प्रशासन या वाढत्या प्रदूषनाला कारणीभूत असलेल्या वीट भट्ट्या विरुद्ध कडक कारवाई करून नागरिकांचे आरोग्याचे रक्षण करावे. अशी मागणी फैजपूर येथील एम मुसा जन विकास सोसायटी संघटित गवंडी कामगार संघटना व भारतीय कामगार संघटना अध्यक्ष शाकिर मलिक व सर्व सदस्य कामगार तसेच मिलतनगर, इस्लामपुरा झोपडपट्टी येथील नागरिक या अर्जाद्वारे करीत आहे. तातडीने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करावी ही अशी मागणी केली.

या विट भट्ट्या विरोधात लवकर कारवाई झाली नाही तर कामगार संघटना या भागातील रहिवासीशां सोबत मोर्चा काढून विभागीय कार्यालय समोर उपोषण करणार याची नोंद घ्यावी असे निवेदन प्रांत कार्यालयात नायब तहसिलदार याना रशीद तडवी व कामगार संघटना उपाध्यक्ष शेख इरफान सचिव शेख कबीर शेख कबीर सद्दाम तडवी करीम नथु तडवी तय्यब सय्यद करीम मोमीन अन्य कामगार रहिवासी यांनी दिले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!