फैजपूर प्रांताधिकारी पदी कैलास कडलग तर यावल तहसील दार म्हणून महेश पवार
यावल (सुरेश पाटील)। फैजपूर उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांची अहमदनगर येथे विशेष भू संपादन अधिकारी म्हणून तर यावल येथील तहसीलदार जितेंद्र कुंवर यांची बदली झाली.
फैजपूर उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी अजित थोरबोले यांची विशेष भूसंपादन अधिकारी म्हणून अहमदनगर येथे बदली झाली असून त्यांच्या जागी तळोदा येथील उपजिल्हाधिकारी कैलास कडलग यांची नियुक्ती झाली असून यावल तहसीलदार जितेंद्र कुवर यांची तहसीलदार सांगायो जी, का जळगाव या रिक्त पदावर बदली झाली असून यांच्या जागी यावल तहसीलदार म्हणून महेश कौतिकराव पवार यांची नियुक्ती झाली आहे
यावल तहसीलदार जितेन्द्र कुवर यांची बदली झाल्याने त्यांच्या जागेवर अहमदनगर येथील तहसीलदार तथा पुनर्वसन अधिकारी महेश कौतिकराव पवार हे यावल येथे तहसीलदार म्हणून पदभार स्विकारणार आहेत.
याबाबतचे आदेश महाराष्ट्र शासन उपसचिव डॉक्टर माधव गिर यांनी दिनांक 1 ऑक्टोंबर 2020 गुरुवार रोजी काढलेले असून त्यांनी आपल्या पदावर तात्काळ रुजू होण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.