भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

सांगवी-भालोद रस्त्यावर नवजात स्त्री जातीचे अर्भक आढळल्याने खळबळ : गुन्हा दाखल !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

यावल, मंडे टू मंडे वृत्तसेवा : तालुक्यातील सांगवी ते भालोद रस्त्यावर एका शेताजवळ नवजात स्त्री जातीचे अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली असून मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. खरंतर समाजात मोठ्या प्रमाणावर ‘बेटी बचाव’ असा नारा देत समाजप्रबोधन केलं जातं. पण त्याचा परिणाम किती लोकांना होतो हा मोठा प्रश्न ? दरम्यान, या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल तालुक्यातील सांगवी ते भालोद रस्त्यावरून काही शेतमजूर आज मंगळवारी १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास शेतात कामाला जात असतांना वाटेत असलेले हरी बोरोले यांच्या शेताजवळ रडण्याचा आवाज आला यावेळी मजुरांनी पाहणी केली असता त्याना नवजात स्री जातीचे अर्भक आढळून आले या घटनेमुळे यावल परिसरात खळबळ उडाली आहे मजुरांनी तातडीने यावल पोलिसांशी संपर्क करून घटनेची माहीती दिली.

दरम्यान, यावल पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारि घटनास्थळी दाखल झाले. नवजात बालकाला उचलून तातडीने ग्रामिण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे याप्रकरणी शेतमजूर महिला लक्ष्मी धनराज भिल ( वय २६ ) यांच्या फिर्यादीवरून अधन्यात माता पित्यावर यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अजमल पठान करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!