भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

तरुणाकडून पैसे घेत लग्न करून फसवणूक करणार्‍या फरार असलेल्या नववधूला अटक

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

यावल,मंडे टू मंडे वृत्तसेवा। यावल तालुक्‍यातील किनगाव येथील धनंजय सोनार या तरुणाकडून पैसे घेत लग्न केल्यावर आठवडाभरात फरार झालेल्या नववधूला यावल पोलिसांनी अटक केली असता तिला यावल न्यायालयात ८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की,किनगाव येथील धनंजय हिरालाल सोनार याचा यशवंत उर्फ दादू विजय पाटील ( रा. सांगली खुर्द ) यांची मानलेली बहीण सरिता प्रकाश कोळी (रा. अंजाळे ) हिच्यासोबत विवाह निश्चित झाला होता. विवाहासाठी सव्वा लाख रुपये द्यावे व लग्नाचा खर्च मुलाने करावा असे ठरवण्यात आले होते. त्याप्रमाणे ८५ हजार रुपयांची रोकड देण्यात आली होती, उर्वरित रक्कम नंतर ते देणार होते. १४ डिसेंबर २०२१ रोजी देहू आळंदी येथील अलंकापुरी मंगल कार्यालय येथे लग्न देखील पार पडले. लग्नाच्या सात दिवसानंतर यशवंत पाटील किनगाव येथे आला व सरिता कोळी हिला तिच्या आईच्या भेटीसाठी घेऊन जात आहे असे सांगून घेऊन गेला तर परत आलाच नाही. सर्वत्र शोधाशोध करून देखील नववधू आणि तिचा मानलेला भाऊ मिळून न आल्यामुळे फसवणूक झाल्याचे सोनार यांच्या लक्षात आले. सोनार यांनी यावल पोलीस ठाण्यात तक्रार दिली. शुक्रवारी यावल पोलीसात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला संशयित आरोपी नववधू सरिता हिला पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी दुपारी न्यायालयात प्रथम वर्ग न्या एन.एच. बनचरे यांच्यासमोर हजर केली असता तिला ८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!