यावल तालुक्यात विहिरीत उडी घेऊन एकाची आत्महत्या
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
यावल,मंडे टू मंडे वृत्तसेवा। तालुक्यातील किनगाव येथील प्रकाश दगडू पाटील ,वय-५५ यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल घडलीय. याबाबत यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
किनगाव येथील प्रकाश पाटील हे आपल्या कुटुंबीयांसह राहत असून काल सायंकाळी ते घरातून कोणालाही काहीही न सांगता दारूच्या नशेत बाहेर निघून गेले. त्यांची पत्नी व नातेवाईकांनी त्यांच्या शोधाशोध केली असता कुठेही मिळून आले नाही. दरम्यान किनगाव शिवारातील धनंजय तुकाराम महाजन यांच्या शेतातील विहिरीत प्रकाश पाटील यांचा मृतदेह आढळून आला. दरम्यान प्रकाश पाटील यांनी विहिरीत उडी घेवून आत्महत्या का केली हे अजून स्पष्ट झालेले नाही. रात्री उशिरापर्यंत विहिरीतून मृतदेह काढून यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी जगन पाटील यांच्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.