प्रौढांची गळफास घेऊन आत्महत्या !
यावल, मंडे टू मंडे वृत्तसेवा : तालुक्यातील कासारखेडा येथील एक वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज बुधवारी दुपारी उघडकीस आली असून याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे, कासारखेडा येथील विकास कुंभार हे मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान, आज त्यांनी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घरात कुणीही नसतांना झोक्याच्या दोरीने छताला गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले आहे. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात कैलास पंढरीनाथ कुंभार यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.