यावल येथे पोलीस व नगरपालिकेची संयुक्त कारवाई; ९८ वाहनाना दंड, पाच मोठ्या दुकानांना सिल
Monday To Monday NewsMetwork।
कोरपावली. ता.यावल (प्रतिनिधी)। जळगाव जिल्ह्यासह यावल तालुक्यात कोरोना विषाणु संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी यांनी आज पासुन अत्यंत कडक निर्बंध लावण्याचे निर्देश दिले असुन , शहरात पोलीस अधिकारी व नगरपरिषद यांनी आज सकाळ पासुनच संचारबंदीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा धडाकाच सुरू केला, यावल शहरातील बुऱ्हाणपुर अकलेश्वर राज्य मार्गाला जोडणाऱ्या प्रमुख मार्गावरील बुरुज चौकात आज सकाळी अकरा वाजे नंतर कोवीड१९च्या निर्बंध घातलेल्या नियमांचे पालन न करता अनावश्यक विनाकारण फिरणाऱ्या ९८ दुचाकी आणी चारचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई करीत १९ हजार३०० रुपये प्रमाणे दंड ठोठावला , तर शहरातील प्रमुख मार्गावरील अनुपम रेडीमेड स्टोअर्सवर १२ हजार रुपये , पाकीजा स्टोअर्स८ हजार रुपये , रूपकला साडी सेन्टर १० हजार रुपये आणी मंगलमुर्तीवर ५ हजार रूपयांची दंडात्मक कार्यवाही करण्यात आली असुन त्यांची दुकाने सिल करण्यात आली, त्याचे कडून एकुण५४ हजार३०० रुपये असे एकुण ७४ हजार रुपये दंडात्मक कारवाईतुन वसुल करण्याात आले . तर नगर परिषदच्या व्यापारी संकुलनातील अनस मोबाईल शॉपवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
फैजपुर विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी नरेन्द्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक सुधीर पाटील , पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार , पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले, विजय पाचपोळे, सलीम शेख , निलेश वाघ , भुषण चव्हाण , असलम खान , सुशिल घुगे , ज्ञानेश्र्वर कोळी, गृहरक्षक दलाचे कर्मचारी यांच्यासह यावल नगर परिषदचे अधिकारी विजय बढे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदचे स्वच्छता निरिक्षक शिवानंद कानडे , मुबिनशेख , रवी काटकर , संदीप पारधे , नितिन पारधे , रामदास घारू यांनी या संयुक्त कार्यवाहीत सहभाग घेतला , दरम्यान प्रशासनाने रस्त्यावर उतरून केलेल्या या धडक कारवाईमुळे लॉक डाऊनचे नियम धाब्यावर ठेवुन अनाश्यक फिरणाऱ्या रिकामटेकड्यांवर आणी शासनाच्या नियमाकडे दुर्लक्ष करीत बाहेरून शटर बंद करून आतुन व्यवसाय करणाऱ्या व्यवसायीकांवर चांगलाच वचक बसेल .